Breaking
ई-पेपर

उद्या सलाबतपुर येथे ७० लक्ष रुपये विविध कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते होणार संपन्न….

0 6 0 4 8 0

उद्या सलाबतपुर येथे ७० लक्ष रुपये विविध कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते होणार संपन्न….

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यात सध्या आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते निमित्त तालुका भरातील गावामध्ये विकास कामाचा शुभारंभाचा धडाका सुरू आहे आमदार विठ्ठलराव लंघे आमदार होताच रस्ता कामा संदर्भात त्यांनी चांगली कंबर कसली आहे . गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नेवासा तालुक्यातील मोठ्या रस्त्याचा बॅकलॉग पाहायला मिळाला आणि त्याच कामाचा ध्यास घेत आमदार विठ्ठलराव लंघे हे तालुका भर रस्ता कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणारे पहिले आमदार ठरत आहे.

त्याच पार्श्वभूमीवरती उद्या सलाबतपुर येथे 70 लक्ष रुपये किमतीच्या विविध रस्ता विकास काम भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये सलाबपूर सबस्टेशन रोड ओडि.आ.र ६८ रस्ता करणे ३० लक्ष रुपये.

मौजे सलाबपूर येथील तुळजाभवानी माता मंदिर सभा मंडप करणे २० लक्ष रुपये.

मौजे सलाबतपूर बाभुळखेडा नांगरे वस्ती रस्ता करणे १० लक्ष रुपये.

मौजे सलाबतपूर येथे सलाबतपुर गावठाण ते गवळी वस्ती रस्ता करणे १० लक्ष रुपये अशा विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभ उद्या ठीक सकाळी नऊ वाजता नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभ हस्ते सलाबतपूर येथे संपन्न होणार आहे.

तरी सलाबतपुर व सलाबतपूर परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. तरी ह्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन होत असल्यामुळे सलाबतपुर व सलाबतपूर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. तसेच होत असल्याच्या कामे ही दर्जेदार पद्धतीने व्हावे ही अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. तरी कामाचा दर्जेदारपणा हा येता काळच ठरवेल.

5/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे