Breaking
ई-पेपरब्रेकिंग

आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या वर मोठी जबाबदारी..

0 6 0 4 8 0

आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या वर मोठी जबाबदारी..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार विठ्ठल राव लंघे पाटील यांच्या वर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, होऊ घातलेल्यास्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर
नेवासा मतदार संघांचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्या चे उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथराव शिंदे यांनी
नेवासा, शेवगाव, पाथर्डी व श्रीगोंदा या नगरपरिषद निवडणुकीचे निवडणूक प्रमुख ( प्रभारी) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय पवार यांनी ही माहिती देताना सांगितले की आमदार विठ्ठल राव लंघे पाटील आपली जबाबदारी
सर्व शिवसेना महायुती चे पदाधिकारी महायुती चे कार्यकर्ते व शिवसैनिक यांना सोबत घेऊन व आपले राजकीय कौशल्य पणाला लावून होऊ घातलेल्या या नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकित शिवसेना महायुती चे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून आणतील व येणाऱ्या काळात सर्व नगरपरिषद नगर पंचायत वर शिवसेना महायुती चा भगवा फडकिविल्या शिवाय व शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावल्या शिवाय राहणार नाहीत असा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला.

3/5 - (3 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे