रत्नागिरी शहरात सकल मराठा वधू-वर परिचय महामेळावा – सोयरिक जुळविण्यासाठी सुवर्णसंधी

*_रत्नागिरी शहरात सकल मराठा वधू-वर परिचय महामेळावा – सोयरिक जुळविण्यासाठी सुवर्णसंधी!_*
*रत्नागिरी, प्रतिनिधी :-* महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
सकल मराठा समाज व मराठा वधू-वर सेवा केंद्र यांच्या वतीने कोकणविभागातील, सकल मराठा समाजातील विवाहेच्छूक वधू-वरांसाठी रत्नागिरी शहरात भव्य वधू-वर ,थेट-भेट परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरात २ मार्च रोजी, प.पू .स्वामी गगनगिरी महाराज आश्रम,थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी येथे हा मेळावा संपन्न होणार आहे.
*”सोयरिक जुळावी, संसार फुलावा!”*
या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महामेळाव्यात विवाहेच्छुक तरुण-तरुणींना आपला योग्य जोडीदार शोधण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विवाहबंधनासाठी नफा-तोट्यापलीकडे जाऊन समाजाला जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मेळाव्यास कोकणातील सर्व जिल्ह्यातील विवाहच्छूक वधु-वर व पालकांसह शिक्षित, उच्चशिक्षित, व्यवसायिक, उद्योजक, कारखानदार, शासकीय, निमशासकीय, इंजिनिअर, वकील,वैद्यकीय,शिक्षण,आयटी क्षेत्रातील तसेच पुणे -मुंबई येथे स्थाईक व नोकरी व्यवसाय करणारे वधु-वर व पालक उपस्थित राहून आपला परिचय करुन देणार आहेत या मेळाव्यात कोकणातील सर्व जिल्ह्यातील विवाहच्छूक वधु-वर
यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा वधु-वर सेवा केंद्रांचे संचालक हरीभाऊ जगताप पाटील यांनी दिली
या कार्यक्रमाला क्षत्रिय मराठा समाज, मराठा फाऊंडेशन,कोकणप्रांत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
*_मेळाव्याचे वैशिष्ट्ये :-_*
*मराठा समाजातील विवाहेच्छुक वधू-वरांची सखोल माहिती उपलब्ध.*
*पालकांसाठी विशेष चर्चा सत्र.*
*विवाह इच्छुकांसाठी मनपसंत स्थळ जुळविण्याचा प्रयत्न.*
*_”जोडीदार हाच खरा साथ देतो,_*
*_विवाहबंधनात जीवन फुलवतो!”_*
तरी इच्छुक वधू-वरांनी व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने नावनोंदणी करून हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे व मराठा वधु-वर सेवा केंद्राचे संचालक हरीभाऊ जगताप,यांनी केले आहे.
संपर्कासाठी 9689047270 या नंबर संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे,
______________________________
मा.संपादक साहेब,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून समाजकार्याला हातभार लावावा, ही नम्र विनंती.
______________________________
*आपला स्नेहांकित,*
*हरीभाऊ जगताप*
संचालक, मराठा वधु-वर सेवा केंद्र महाराष्ट्र राज्य,
9689047270