Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

*ग्रामपंचायतींना मोठा दिलासा! जनसुविधा योजनेच्या कामांच्या व्याप्तीत मोठी वाढ*

*सार्वजनिक दिवाबत्ती, सोलर बसविणे, वाचनालय इमारत व गावातील शासकीय जागांचे सौंदर्यीकरण यासह नवीन कामांना मंजुरी*

0 8 9 9 8 1

*ग्रामपंचायतींना मोठा दिलासा! जनसुविधा योजनेच्या कामांच्या व्याप्तीत मोठी वाढ*

*सार्वजनिक दिवाबत्ती, सोलर बसविणे, वाचनालय इमारत व गावातील शासकीय जागांचे सौंदर्यीकरण यासह नवीन कामांना मंजुरी*

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘ग्रामपंचायतीतील जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या कामांच्या व्याप्तीत वाढ केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 20 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला.
यापूर्वी जनसुविधा योजनेअंतर्गत मर्यादित स्वरूपाची कामे मंजूर होत होती. मात्र, ग्रामपंचायतींकडून सातत्याने नवीन कामांचा समावेश करण्याची मागणी होत असल्याने शासनाने या योजनेत आणखी काही विकासकामांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्याने मंजूर करण्यात आलेली कामे
गावातील सार्वजनिक दिवाबत्तीची सोय – खर्च मर्यादा 15 लाख रुपये
शासकीय कार्यालयांवर सोलर यंत्रणा बसविणे – 20 लाख रुपये
वाचनालय इमारतीचे बांधकाम – 20 लाख रुपये
क्रीडांगणांचा विकास – 20 लाख रुपये
गावातील शासकीय जागांचे सौंदर्यीकरण – 15 लाख रुपये
शासनाने स्पष्ट केले आहे की, या योजनेअंतर्गत मंजूर होणारी कामे इतर कोणत्याही योजनेतून प्रस्तावित करता येणार नाहीत.
या निर्णयामुळे राज्यातील ग्रामपंचायतींना गावाच्या गरजेनुसार अधिक विकासकामे हाती घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, ऊर्जा बचत, वाचन संस्कृती, क्रीडा सुविधा आणि सार्वजनिक ठिकाणांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे