श्री अनंत गोपाळनाथ पायी दिंडी सोहळ्याची श्रीक्षेत्र सलाबतपूर (गोपाळनाथ नगर) इथून आज सकाळी नऊ वाजता साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये देवगड भक्त परिवाराच्या शुभ आशीर्वादाने पंढरपूरकडे प्रस्थान….
श्री अनंत गोपाळनाथ पायी दिंडी सोहळ्याची श्रीक्षेत्र सलाबतपूर (गोपाळनाथ नगर) इथून आज सकाळी नऊ वाजता साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये देवगड भक्त परिवाराच्या शुभ आशीर्वादाने पंढरपूरकडे प्रस्थान…...
नेवासा प्रतिनिधी – मंगेश निकम
श्री अनंत गोपाळनाथ पायी दिंडी सोहळ्याचे श्री क्षेत्र सलाबतपुर ते श्रीक्षेत्र पंढरपूर कडे आज सकाळी नऊ वाजता साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान झाले आहे.
सकाळी सलाबतपुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिंडी सोहळ्याच्या अनंत गोपाळनाथ महाराज पालखीचे सलाबतपुरचे पुरोहित जोशी देवा यांच्या हस्ते पूजन करून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले.
याप्रसंगी टाळ मृदुंगाच्या जय घोषामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम जय घोशात पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले.
या दिंडी सोहळ्यामध्ये देवगड भक्त परिवाराच्या वतीने ह.भ.प चावरे महाराज यांनी दिंडी प्रस्तावनावेळी उपस्थित राहून दिंडी सोहळ्यासाठी शुभ आशीर्वाद दिले.
यावेळी सलाबतपुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिंडी सोहळ्यासाठी औषधोपचार, किट देण्यात आली यावेळी सलाबतपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे महिला आरोग्य सेविका तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
या दिंडी सोहळ्याप्रसंगी दिंडी चालक पोपटराव मधुकर निकम, तानाजी बोरुडे, विणेकरी रावसाहेब निकम, सुरेश देवा जोशी, भीमभाऊ महाराज निकम, अशोक निकम ,बाळासाहेब रावसाहेब निकम, रमेश वाघ, भाऊसाहेब गोरे, देविदास निकम, मृदंगाचार्य रोहीदास बोरुडे, कोटेश्वर साऊंड सिस्टिम एकनाथ शेळके.
तसेच सलाबतपुर गोपाळनाथ नगर व परिसरातील गळलिंब, सलाबतपुर परिसरातील वारकरी भजनी मंडळ तसेच महिला भजनी मंडळ महिला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.