*पत्रकार प्रल्हाद शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; नेवासा बुद्रुक व सुरेगाव फाट्यावर गतिरोधक*
*नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल; सुरेगाव ग्रामस्थांकडून शाल व श्रीफळ देऊन सन्मान*

*पत्रकार प्रल्हाद शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; नेवासा बुद्रुक व सुरेगाव फाट्यावर गतिरोधक*
*नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल; सुरेगाव ग्रामस्थांकडून शाल व श्रीफळ देऊन सन्मान*
नेवासा प्रतिनिधी :
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा–श्रीरामपूर मुख्य रस्त्यावरील नेवासा बुद्रुक व सुरेगाव (गंगा) फाटा येथील अपघातप्रवण वळणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) वतीने गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
या ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्यासाठी पत्रकार प्रल्हाद शिंदे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांकडे पत्रव्यवहार करून गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीची दखल घेऊन दोन्ही ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व संबंधितांचे शिंदे यांनी आभार मानले. दरम्यान, जनहितासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत सुरेगाव (गंगा) येथील ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार प्रल्हाद शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.




