Breaking
ई-पेपर

*नेवासा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकरी व पशुधनासाठी तातडीची मदत द्या*

*भाजप तालुका उपाध्यक्ष विशाल धनगर यांचे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

0 9 5 0 2 3

*नेवासा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकरी व पशुधनासाठी तातडीची मदत द्या*

*भाजप तालुका उपाध्यक्ष विशाल धनगर यांचे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

नेवासा तालुका प्रतिनिधी –

नेवासा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके, पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर नेवासा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व पशुपालकांना आर्थिक मदत, जनावरांसाठी चारा छावण्या तसेच विविध सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी भाजप नेवासा तालुका उपाध्यक्ष विशाल बापूराव धनगर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार नेवासा तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चालू खरीप हंगामात जून ते सप्टेंबरदरम्यान अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. सोयाबीन, कापूस, ऊस, मका, बाजरी यांसह इतर पिके तसेच जनावरांचा चारा पावसाअभावी संकटात सापडला आहे. निवेदनानुसार, पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे बियाणे, खते व मशागतीवरील खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत असून विहिरी व कूपनलिका कोरड्या पडत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर पाऊस नसल्याने जनावरांच्या हिरव्या व वाळलेल्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून पशुधन जगविणे पशुपालकांसाठी आव्हान ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यात अधिकृतपणे ‘गंभीर दुष्काळ’ (Severe Drought) जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये व वाड्या-वस्त्यांवर शासकीय यंत्रणेमार्फत टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, पशुधन वाचविण्यासाठी तालुक्यातील आवश्यक ठिकाणी सरकारी अनुदानावर चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीचा विद्यार्थ्यांवर होणारा आर्थिक परिणाम लक्षात घेऊन तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि शेतकरी, पशुपालक तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विशाल धनगर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे