Breaking
ई-पेपर

*भेंडा फॅक्टरी जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी; २७ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

0 8 9 9 8 9

*भेंडा फॅक्टरी जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी; २७ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

नेवासा – (प्रतिनिधी) : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भेंडा फॅक्टरी येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण असून पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल १२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत यशाची परंपरा कायम राखली. यामध्ये ऋत्वा राजेंद्र गवळी हिने २६० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर गायत्री राम नजन (२२८ गुण) व सिद्धेश योगेश फुलारी (२२२ गुण) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
याशिवाय आराध्या बाळासाहेब हिवाळे (१६४), स्वरा राहुल कोलते (१५२), आफरीन खाकीसाहेब सय्यद (१५०), रुद्र संदीप निकम (१४६), सर्वेश भाऊसाहेब जगताप (१४२), श्लोक अक्षय रसाळ (१३८), मरियम मोसिन पठाण (१३६), कार्तिकी सुनील शिंदे (१२८) आणि माऊली तात्यासाहेब कापसे (१२६) यांनीही उल्लेखनीय गुण मिळवत यश संपादन केले.
या गुणवंत विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक – कानिफनाथ दौंड, सुनिता माळशिखरे, व मंगल मुळे यांचे मार्गदर्शन लाभले या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेने राबविलेले गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम यांचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यावर शाळेने दिलेला भर या यशातून अधोरेखित झाला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक – संजय कडुस ,
सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे