कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा संपन्न..
सुरक्षा समितीची स्थापना

कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक
शाळेत पालक मेळावा संपन्न
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
बदलापूर घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने सुरक्षा समितीची स्थापना तसेच विविध मुद्यावर कुकाणा जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा संपन्न झाला.
मेळाव्यात कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास गरड हे होते. या प्रसंगी माजी अध्यक्ष सोमनाथ कचरे हे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले.शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबद तसेच
नविन 2 वर्गखोल्यासाठी मुलांच्या बैठक व्यवस्थे साठी बँचेस बाबद व
डिजिटल शिक्षण प्रणाली साठी नवीन इन्ट्रॅक्टटिव्ह बोर्ड मागणीबाबत ग्रामपंचायत ला मागणी केलेली असून त्याची पूर्तता होणार असल्याने या वेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यमंडळाचे या वेळी पालक व व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार व्यक्त केले. या वेळी
मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला असून सध्या समाजात वेगवेगळ्या अनपेक्षित घटना घडत आहेत त्यासाठी शालेय सुरक्षा कमिटीची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी
मुलांना वाहतुकीचे नियम सूचनांचे पालन
मुलांना स्वच्छतेचे महत्व
शालेय प्रसाधन गृह ची देखभाल , दुरूस्ती
सकस आहार नविन परिपत्रक बदल चर्चा तर काही आहार पोषण या वर चर्चा करण्यात आली.
पालकांच्या आध्ययनाबाबतीत काही सूचना मांडण्यात आल्या.महिला पालकांचा चर्चेत मोठा सहभाग पाहायला मिळाला
त्यावर सकारात्मक चर्चा करून मुख्याध्यापिका विजया झावरे कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.लोकसहभागातून शाळेसाठी विविध उपक्रम घेता येतील या साठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष देविदास गरड यांनी केले
मेळाव्यासाठी व्यवस्थापन समितीचे , उपाध्यक्ष महेश सदावर्ते अरून फोलाने, सागर गोरडे समीर शेख सर, गरड सर,शरद कावरे, भगवान कचरे,आणासाहेब गायकवाड, प्रमोद दरंदले, डॉ. पूजा भागवत,शरदराव कचरे, वैशाली पंजाबराव देशमुख, सुप्रिया प्रशांत उंडे , मयुरी हांडे, कैलास लोंढे यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अशोक राठोड यांनी केले तर आभार बाळासाहेब डाके यांनी आभार मानले.