नेवासा नगरपंचायत चौका जवळ पुन्हा एकदा भीषण आगीची घटना घडली आहे त्यामध्ये७ ते ८ दुकाने जळून खाक.
नेवासा नगरपंचायत चौका जवळ पुन्हा एकदा भीषण आगीची घटना घडली आहे त्यामध्ये७ ते ८ दुकाने जळून खाक.
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
२७ जुलै २०२४ रोजी याच परिसरात लागलेल्या आगीची आठवण ताजी असतानाच आज १९ नोव्हेंबर २०२५ रोजी आणखी एक आग लागून दुकानदारांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली तात्काळ नेवासा नगरपंचायत च्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली मात्र आगे विझवायला जाईपर्यंत आगिनी इतका प्रचंड वेग धारण केला होता की यामध्ये सात ते आठ दुकाने जळून खाक झाली होती.
एका गाडीच्या सहाय्याने आग आटोक्यात येत नसल्याने काही स्थानिक नागरिकांनी ही स्वतःच्या परीने आग विझवण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु आगीचे रुद्र रूप असल्याकारणाने नागरिकही हातबल झाली .
यानंतर काही वेळातच ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व मुळा सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या या सर्व संयुक्त प्रयत्न केल्यानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आली या घटनेत अनेक दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानाचे अचूक प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाहीत आगीचे कारणही अद्याप समोर
आलेल नसून.
गेल्या दोन वर्षात या परिसरात आगेच्या घटनांमुळे नेवासकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा उपयांवर प्रशासनावरील प्रश्नचिन्ह सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.




