आरोग्य व शिक्षणई-पेपर
पुस्तक वाचनाने व्यक्तिमत्व सुधारते :- उप मुख्य कार्यकारी.राहुल शेळके.
कविवर्य कुसुमाग्रज वाचनालयाचे उद्घाटन

0
6
0
4
8
0
पुस्तक वाचनाने व्यक्तिमत्व सुधारते :- उप मुख्य कार्यकारी.राहुल शेळके.

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री आनंद भंडारी साहेब यांच्या कल्पनेतून व श्री.भास्कर पाटील शिक्षणाधिकारी (प्राथमिक),डॉ.संजय कळमकर ज्येष्ठ साहित्यिक तथा गटशिक्षणाधिकारी नेवासा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमध्ये साकारत असलेले कुसुमाग्रज वाचनालय निर्मिती अभियानांतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळनिंब येथे कविवर्य कुसुमाग्रज वाचनालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद अहिल्यानगरचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी मा. राहुल शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथ दिंडी काढली.ढोल ताशे व लेझीम पथकाने गावकऱ्यांचे लक्ष आकर्षित केले. ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला.त्यानंतर शाळेमध्ये ग्रंथालय उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते.उद्घाटन सोहळ्याप्रसंगी केलेल्या भाषणामध्ये मा.श्री.राहुल शेळके साहेब यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. आदर्श व्यक्तिमत्व घडवायचे असेल व आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शालेय जीवनापासूनच पुस्तक वाचण्याची सवय जोपासावी. आत्ताची पिढी ही समाज माध्यमाच्या विळख्यात सापडली आहे.मोबाईलचे व्यसन हे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे ऑनलाइन गेम खेळण्याच्या नादात विद्यार्थी मैदानावर खेळ खेळताना दिसत नाहीत तसेच ते कुठलेही वाचन करतानाही दिसत नाहीत. वाचनाची ही गोडी लागावी व मोबाईल पासून विद्यार्थी दूर जावेत यासाठी हा उपक्रम जिल्हाभर राबवला जात आहे. वाचन करण्यासाठी बैठक महत्त्वाची आहे आणि एकदाका ही बैठक साधली की तुम्हाला भावी आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा या सवयीचा फायदा होतो असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी श्री.हरिभाऊ शेळके.श्री.अशोकराव शेळके माजी सभापती पंचायत समिती नेवासा,दादासाहेब शेळके जिल्हा परिषद सदस्य अहिल्यानगर,दादा पाटील शेळके माजी नायब तहसीलदार, श्री.जनाभाऊ शेळके माजी सरपंच,सौ.कुसुमताई खर्जुले सरपंच,श्री.बाळासाहेब खर्जुले जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना,श्री. निलेश शेळके माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष,महेंद्र कुमार खामकर खजिनदार विद्यार्थी संघ,संपत शेळके व्यवस्थापन समिती अध्यक्ष,संदीप काटे,संदीप मुळे,श्री.दत्तात्रय शेळके, व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.माजी विद्यार्थी संघाच्या सहभागातून शाळेने 15000 रुपयांची पुस्तके खरेदी केली आहेत.
शाळेमध्ये आठवड्यातून दोन दिवस वाचन बेल हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.वाचन बेल झाल्यानंतर मुलांनी वाचनालयातील पुस्तकांचे 45 मिनिटे वाचन करायचे व आपल्याला त्या पुस्तकातील आवडलेले वाक्य व विचार याच्या नोंदी देण्यात आलेल्या कागदावर करायच्या.दुसऱ्या दिवशी शालेय परिपाठामध्ये मी वाचलेले पुस्तक व त्यामधील आवडलेल्या गोष्टी किंवा प्रसंग विद्यार्थ्यांनी सांगायचे.असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भारत गवळी यांनी केले तर अशोक मोरे, मोहनीराज थोरात,शरद खरात व अंबादास शेळके यांनी मनोगत व्यक्त केले तर दिपाली जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.भानुदास घाडगे यांनी याप्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त केले
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
6
0
4
8
0




