Breaking
ई-पेपर

धामोरी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराजांच्या काल्याचे कीर्तनाने उत्साहात सांगता..

0 6 5 7 8 2

*धामोरी येथील अखंड हरिनाम सप्ताहाची स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराजांच्या काल्याचे कीर्तनाने उत्साहात सांगता..

नेवासा प्रतिनिधी-  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड पूर्व बाजूला शेजारीच प्रवरा नदी नदीच्या काठावर वसलेले सुंदर व आध्यात्मिक क्षेत्रात कायम अग्रेसर असलेले व श्री समर्थ सद्गुगुरु किसनगिरी बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मौजे धामोरी येथे गेल्या सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहात भजन, कीर्तन श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, हरिपाठ , राम कथा प्रवचन,काकडा भजन व सकाळ संध्याकाळअन्नदान अशा अध्यात्मिक वातावरणात गेले सात दिवस येथे धामोरी परिसर खेळी मेळीच्या वातावरणात टाळ मृदुंगाच्या आवाजाने सात दिवस परिसर दुमदुमून गेला होता . अध्यात्मिक अधिष्ठान असलेले श्री समर्थ सद्गुगुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने व वैकुंठवासी ह भ प नाशिकेत महाराज कोरेकर यांच्या कृपाशीर्वादाने सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य महंत ह भ प भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वीस वर्षापासून ही सप्ताह परंपरा जपत धामोरी ग्रामस्थांनी अध्यात्मिक ज्ञान यज्ञ चालू ठेवला आहे, सप्ताह काळात व्यासपीठ व मृदुंग वादन देवगड विद्यार्थी असणारे ह भ प शशिकांत महाराज कोरेकर, ह भ प गणेश महाराज तनपुरे,, ह भ प अतुल महाराज पटारे, ह भ प रोहित महाराज पटारे यांनी सांभाळले तसेच ह भ प ज्ञानेश्वर माऊली हजारे, ह भ प अंकुश महाराज जगताप, ह भ प रमेशानंद गिरी महाराज, ह भ प सागर महाराज टेमक, ह भ प हनुमंत महाराज वैष्णव सेवा आश्रम या महाराज मंडळींचे किर्तन सेवा सात दिवस रात्रीआठ ते दहा या वेळात संपन्न झाली,आज श्री क्षेत्र देवगड संस्थांचे उत्तराधिकारी हभप स्वामी प्रकाशनंद गिरी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात सप्ताहाची सांगता झाली. या सप्ताह साठी विशेष सहकार्य व अन्नदान पोपट वरखडे,दीपक पटारे,पोपट पठाडे, बन्सी पठाडे, आकाश पटारे,अशोक पटारे, मच्छिंद्र दाणे, कडूबाळ पटारे,बाबासाहेब पटारे, उत्तम पटारे,अतुल पटारे, जगन्नाथ पटारे, भारत पटारे, किशोर पटारे,बाळासाहेब पटारे, शांतीलाल वरखडे, सुभाष निपुंगे अशोक जाधव, किशोर जमदाडे ज्ञानेश्वर जमदाडे, विष्णू घोरपडे अरुण गायकवाड पंढरीनाथ पिंपळे ,बबन वरखडे, रावसाहेब पटारे, मच्छिंद्र असणे रघुनाथ पटारे,मच्छिंद्र पटारे या भाविकांचे वतीने सात दिवस सकाळ संध्याकाळअन्नदान झाले तसेच सप्ताह कमिटी मध्ये यादव पटारे , संदीप पटारे,जगन्नाथ महाराज पटारे, ज्ञानेश्वर जमदाडे, चेअरमन नवनाथ पटारे, अशोक जाधव, आदिनाथ पटारे, कैलास पटारे, राम पटारे,देवगड स्वच्छता सेवाधारी महिला मंडळ व पाकशाळा सेवाधारी मंडळ धामोरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सप्ताह काळात अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली त्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मठाधिपती ह भ प देविदास महाराज म्हस्के, आमदार सौभाग्यवती रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते ऋषिकेश शेटे, भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोलते, नेवासा नगरपंचायत चे गटनेते महेश अण्णा लोखंडे, भाजप तालुका अध्यक्ष मनोज अण्णा पारखे,भाजप अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाप्रमुख नानासाहेब डौले, शिरजगाव भाजपा बूथ अध्यक्ष सचिन गवांदे नगरसेवक अंकुश मस्के नगरसेवक संदीप सरकाळेआदी मान्यवरांनी सप्ताह दरम्यान भेट दिली. काकडा भजनी मंडळ यांच्या विनंतीला मान देऊन तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्न करून सप्ताह काळात अविरत व भारनियमन मुक्त अविरत विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल धामोरी ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने आमदार साहेबांचे आभार मानण्यात आले. तसेच परमपूज्य गुरुवर्य स्वामीजींच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून महाप्रसाद कचरू पटारे ,लक्ष्मण पटारे, गोरक्षनाथ गाडे ,दत्तात्रय घोरपडे अविनाश दाणे या भाविकांच्या वतीने काला महाप्रसाद देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पटारे वआदिनाथ पटारे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 7 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे