*आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील हे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व : केंद्रीय मंत्री रामदास आठवले*

आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील हे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
नेवासा : प्रतिनिधी —
नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील हे सर्व जाती-धर्माच्या घटकांना सोबत घेऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) असल्याने महायुतीला नेवासा मतदारसंघात अधिक भक्कम ताकद मिळाली आहे. महायुतीचा धर्म पाळत राज्यात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला भक्कम साथ देण्यासाठी रिपाईचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे श्रीरामपूरकडे जात असताना सोमवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता नेवासा फाटा येथील आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी ना. रामदास आठवले यांचा सत्कार केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये नेवासा तालुक्यासह विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाली. आठवले यांनी लंघे-पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत महायुतीतील घटक पक्षांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब वाघ, रिपाईचे नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, शहराध्यक्ष पप्पू इंगळे, पत्रकार राजेंद्र वाघमारे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत कर्डक, राम केंदळे, सुनील वाघमारे, अरुणराव मिसाळ, दयानंद खिलारी, सुरेशराव गायकवाड, संजय बनसोडे, नितीन भालेराव, विजय राजगुरू, नगरसेवक महेश लोखंडे, संदीप सरकाळे, प्रवीण सरोदे, अंकुश म्हस्के, निरंजन डहाळे, कृष्णा परदेशी, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप आदी उपस्थित होते.
तसेच रिपाईचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे, शहराध्यक्ष पप्पूभाऊ इंगळे, विजय राजगुरू, संतोष मोरे, अशोक राजगुरू, संदीप चाबुकस्वार, विजय पवार यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



