Breaking
ई-पेपर

*मुळा सहकारी साखर कारखान्यात सहकार पॅनलच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा*

0 9 0 0 1 5

*मुळा सहकारी साखर कारखान्यात सहकार पॅनलच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा*

नेवासा (प्रतिनिधी): – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

मुळा सहकारी साखर कारखाना लि., सोनई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनलच्या पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता मुळा पब्लिक स्कूल, सोनई येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेस माजी मंत्री तथा आमदार शंकरराव गडाख पाटील हे प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शन करणार असून, सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार यशवंतरावजी गडाख हे राहणार आहेत.
या प्रचार सभेत उत्पादक सभासद मतदार संघातील उमेदवार चंद्रकांत भानुदास टेमकर व ज्ञानेश्वर रामराव दरंदले, तसेच महिला प्रतिनिधी मतदार संघातील उमेदवार कमल चांगदेव दहिफळे व विमल नारायण सोनवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
सहकार पॅनलच्या वतीने सर्व सभासद बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे