Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजन

हमीद सय्यद राज्य सांस्कृतिक युवा पुरस्काराने सन्मानित…

0 6 0 4 8 0

हमीद सय्यद राज्य सांस्कृतिक युवा पुरस्काराने सन्मानित…

मुबंई विशेष प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि २०२५ वितरण सोहळा दि. 3 डिसेंबर 2025रोजी सायं 7वा रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झाला….
यात हमीद सय्यद यांना राज्य सांस्कृतिक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारूड /विधिनाट्य विभागात राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार2024 सांस्कृतिक कार्य मंत्री आदरणीय अँड आशिषजी शेलार साहेब, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव आदरणीय डॉ किरण कुलकर्णी साहेब,सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आदरणीय विभीषण चौरे साहेब, सहसंचालक आदरणीय श्रीराम पांडे साहेब यांचे शुभहस्ते स्वीकारताना अंत्यन्त आनंद झाल्याच्या प्रतिक्रिया सय्यद यांनी दिली… विशेषतः वयाच्या 12व्या वर्षांपासून करत असलेल्या अखंड भारूड सेवा आणि लोकप्रबोधन साधनेला राज्य शसनाकडून सन्मान मिळणे हे सय्यद यांच्या साठी खूप भावनिक आणि प्रेरणादायी असल्याचे हमीद सय्यद म्हणाले..हा केवळ माझा सन्मान नसून महाराष्ट्राच्या संत पंपरेचे माझ्या सर्व गुरुजणांचे यश आहे. पुरस्कारासाठी निवड समितीचे आणि महाराष्ट्र शासनाचे हमीद सय्यद यांनी आभार मानले.

2/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे