Breaking
ई-पेपर

ग्रामसभेत महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सामुहिक संविधान वाचन

0 6 0 5 0 8

ग्रामसभेत महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सामुहिक संविधान वाचन.

भेंडा – प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

जागतिक महिला दिनानिमित्त भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहात झालेल्या महिला ग्रामसभेत माजी महिला ग्रामपंचायत पदाधिका-यांचा सन्मान ग्रामपंचायत वतीने करण्यात आला . तसेच सामुहिक संविधान वाचन करण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच संगीता शिंदे होत्या .
याप्रसंगी व्यासपीठावर एकात्मिक बाल विकास प्रकल्पचे सचिन ठाकरे , ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे , स्मिता काळे , सीमा फुलारी ,प्रा. उषा मिसाळ , सुमनबाई काळे , रोहिणी निकम , लता सोनवणे , राजश्री यादव , सामाजिक कार्यकर्ते कारभारी गरड , पत्रकार नामदेव शिंदे , डाॕ. लहानु मिसाळ , येडुभाऊ सोनवणे , अंबादास गोंडे आदिंचीउपस्थिती होती.
बाबासाहेब गोर्डे यांनी ग्रामसभेचा उद्देश सांगुन देशातिल कर्तृत्ववान महिलांचा इतिहास सांगीतला. अंबादास गोंडे , विजय फुलारी , देवेंद्र काळे , कारभारी गरड , नामदेव शिंदे , प्रा. उषा मिसाळ आदिंनी मनोगत व्यक्त करुन महिलांना शुभेच्छा दिल्या . माजी सरपंच सुमन काळे , सखुबाई गोंडे , प्रा.उषा मिसाळ , रोहिणी निकम , उपसरपंच सिमा फुलारी , आदिंचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
महिला दिनानिमित्त रिना सचिन अढागळे यांच्या घरकुल बांधकामाचे उदघाटन उपस्थित सरपंच , उपसरपंच महिलांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यात शिव्या बंदी करावी आणि विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी असा राज्य शासनाने कायदा करावा , यासाठी सौंदाळा येथील आमरण उपोषणास पाठिंबा देण्याचा ठराव कारभारी गरड यांनी मांडला. त्यास अंबादास गोंडे यांनी अनुमोदन दिले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे