Breaking
महाराष्ट्र

देडगाव ,माका, पाचुंदा शिवारातील पावन महागणपतीला भाविकांची मांदियाळी.

0 6 0 5 3 3

देडगाव ,माका, पाचुंदा शिवारातील पावन महागणपतीला भाविकांची मांदियाळी.

बालाजी देडगाव:- ( युनूस पठाण) :-

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा ,माका, म.ल. हिवरा परिसरातील पावन महागणपतीला अंगारक संकष्ट चतुर्थी( मंगळी चतुर्थी) निमित्ताने भाविकांचा उच्चांक पाहायला मिळाला. ही चतुर्थी बऱ्याच कालावधीने आल्यामुळे तालुक्यातील भाविक दर्शनासाठी आले होते.
या परिसरात वडाची झाडे असल्याने वडाचा गणपती म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध होत आहे. या परिसरात बालाजी फाउंडेशन व पावन महागणपती देवस्थानच्या वतीने अनेक प्रकारची वृक्ष लागवड केलेली आहे .त्यामुळे हा परिसर निसर्गरम्य बनला आहे. पर्यटन स्थळ म्हणून लोक या गणपतीला आवर्जून येत असतात. हा गणपती नवसाला पावणारा आहे अशी ख्याती पारंपारिक आहे. बाराही महिने प्रत्येक चतुर्थीला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. या देवस्थानच्या पर्यटन स्थळाला अहमदनगर जिल्ह्यातून शालेय सहली भेट देत असतात . वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. व या ठिकाणी दरवर्षी नामवंत महाराजांच्या कीर्तनाने मोठ्या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते.
आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तो महाप्रसाद भाऊसाहेब मुंगसे साहेब ,विष्णू मोहन तांबे व कचरे गुरुजी यांच्यावतीने देण्यात आला होता. त्यानिमित्ताने उबाळे ट्रॅव्हल्स कंपनी चे मालक शिवाजीराव उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी या देवस्थानास पाच हजार एक रुपया (५००१ रू.) देणगी दिली. त्यानिमित्ताने परिसरातील भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहून गाथा मूर्ती हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या उपस्थितीत हरिनामाच्या भजनाने परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी परिसरातून हजारो भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याने भाविकांची मोठी मांदियाळी बघायला मिळाली.
हा चतुर्थी सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे ,आजिनाथ कुटे, भाऊसाहेब मुंगसे, बन्सी आप्पा मुंगसे ,नवनाथ रक्ताटे, टांगळ मामा आदी विश्वस्तांनी परिश्रम घेत मोठे कष्ट घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे