Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

0 4 6 1 7 7

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र शासन (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या नियोजनानुसार नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई येथे शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी भूषवले.

कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शूज-सॉक्स व शैक्षणिक साहित्य आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शाळेचे वातावरण व शिक्षकांचा उत्साह पाहून आमदार साहेबांनी शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम,शमी शेख सर, राम शिंदे सर,सौ. अनिता कर्डिले (सरपंच), सोमनाथ पाटेकर (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), सोपानराव कर्डिले, दिलीपराव काकडे, निलेश कर्डिले, बापूराव बिडकर, संभाजी राजे जगताप, ज्ञानेश्वर कर्डिले, गोरक्षनाथ भागवत, काकासाहेब गोरे, कैलास काळे, मामा विनायक कर्डिले, रमेश भालेकर, आसाराम कर्डिले, समीर पाटेकर, ज्ञानेश्वर आदमाने, गोरक्षनाथ बर्वे, अमोल बर्वे, शंकरराव खाटीक, शंकरराव शिरसाट यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री रामेश्वर चोपडे यांनी केले, सूत्रसंचालन श्री रमेश राऊत सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री बापूसाहेब सोनवणे सर यांनी मानले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेतील सहशिक्षक श्री जयप्रकाश राशिनकर सर, श्री शिवराज जाधव सर, श्रीमती संध्या शिंदे मॅडम, श्रीमती निशा शेरे मॅडम, श्री प्रदीप सरोदे सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे