Breaking
ई-पेपर

*भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी कुणाल बोरुडे यांची निवड*

0 9 0 0 0 3

*भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी कुणाल बोरुडे यांची निवड*

नेवासा प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील युवा कार्यकर्ते तथा भाजपचे निष्ठावान पदाधिकारी कुणाल बोरुडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी यांनी जाहीर केली.
कुणाल बोरुडे यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चामध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांनी तालुका युवा मोर्चा सचिव, तालुका मीडिया संयोजक, जिल्हा सोशल मीडिया संयोजक अशा महत्त्वाच्या पदांवर कार्य करत संघटनात्मक कामात आपला ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
या निवडीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे तसेच उत्तर अहिल्यानगर भाजप आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ पटारे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष कुणाल बोरुडे म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात युवा मोर्चाची संघटना अधिक मजबूत करून युवकांची मोठी फळी भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करेन. मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देत पक्षवाढीसाठी सातत्याने कार्यरत राहीन.”
युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या भाजपच्या धोरणाचा भाग म्हणून झालेल्या या निवडीमुळे नेवासा तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे