Breaking
ई-पेपर

*जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लंघे दाम्पत्याचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल*

*नेवासा मतदारसंघात राजकीय समीकरणांना वेग; महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती*

0 9 5 0 2 3

*जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लंघे दाम्पत्याचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल*

*नेवासा मतदारसंघात राजकीय समीकरणांना वेग; महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती*

अहिल्यानगर :

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नेवासा मतदारसंघातून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि महिला राखीव मतदारसंघातून सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील नेवासा तालुक्यातील राजकीय हालचालींना आता अधिक वेग आला आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी इतर नागरिकांचा मागासवर्गीय मतदारसंघातून, तर सौ. रत्नमाला लंघे पाटील यांनी महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. यावेळी आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह महायुतीतील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लंघे यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करताना निवडणुकीत सर्वांना विचारात घेऊन पुढील निर्णय व्हावा, तसेच महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय आणि आदेश अंतिम राहील, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लंघे यांच्या भूमिकेकडे आणि पुढील राजकीय वाटचालीकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नेवासा मतदारसंघातून लंघे दाम्पत्याने निवडणुकीच्या मैदानात अधिकृतपणे प्रवेश केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील स्थानिक राजकीय समीकरणांनाही नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. आता अर्जांची छाननी, उमेदवारी माघारीची प्रक्रिया आणि त्यानंतरचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यावर निवडणुकीतील खरी रंगत समोर येणार आहे.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे