Breaking
ई-पेपर

कुकाणा स्टेट बँकेकडून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतून दोन लाखांची मदत मंजूर.

दोन लाख रुपयांची मदत मिळाल्याने धनवटे कुटूंबाला दिलासा.

0 6 0 5 2 1

कुकाणा स्टेट बँकेकडून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतून दोन लाखांची मदत मंजूर.

दोन लाख रुपयांची मदत मिळाल्याने धनवटे कुटूंबाला दिलासा…

नेवासा प्रतिनिधी –

तालुक्यातील कुकाणा स्टेट बँकेकडून अपघाती निधन झालेल्या महिला खातेदाराच्या कुटुंबाला पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेतून मंजूर झालेली दोन लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील रहिवासी संजय धनवटे यांना कुकाणा स्टेट बँक इंडिया या शाखेतील सुरक्षा कर्मचारी ईश्वर काळे यांनी बँकेच्या खातेदार जयश्री संजय धनवटे यांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची माहिती दिली होती. धनवटे यांनी कुकाणा शाखेतून २० रुपयांत आपला अपघाती विमा काढून घेतला होता. जयश्री संजय धनवटे यांचा चिलेखनवाडी येथे अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांचे पती संजय धनवटे यांनी विमा दावा दाखल केला होता. त्यांचा

अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार असून पती मोलमजुरी करत आहेत. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया कुकाणा शाखेत विमा मंजूर झाल्याने कुटुंबाला मोठा आधार मिळाला असल्याचे जयश्री धनवटे यांचे पती संजय धनवटे यांनी सांगितले. सदर दोन लाख रुपये मदतीचा धनादेश शाखाधिकारी अमरज्योती यांच्याहस्ते धनवटे कुटुंबाला प्रदान करण्यात आला.
बँक शाखाधिकारी अमरज्योती यांनी माहिती
देताना सांगितले, वर्षभरात फक्त ४३६ रुपये भरून २ लाख रुपये अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा मिळतो. तर २० रुपये भरून अपघाती दोन लाख रुपये विमा मिळत असून पंतप्रधान विमा योजना ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. ही योजना अपघात किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभघ्यावा, असे आवाहन स्टेट बँक कुकाणा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे