Breaking
ई-पेपर

श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयाची देवगड येथे काल्याची दहीहंडी फोडून सांगता

0 6 0 5 0 7

श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयाची देवगड येथे काल्याची दहीहंडी फोडून सांगता

नेवासा(प्रतिनिधी) महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

 

नेवासा तालुक्यातील क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे निर्माते श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या सहा दिवशीय पुण्यतिथी सोहळयाची सोमवारी दि.१६ मार्च रोजी राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या उपस्थितीत उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.


संत महात्म्यांचे जीवन हे समाजाच्या उद्धारासाठी असून  त्यांचे कार्य हे किर्तीरुपाने जगात रहाते साधूंचे जीवन राष्ट्र व धर्माच्या हितासाठी समर्पित असते असे प्रतिपादन स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या उपस्थित झालेल्या    काल्याच्या किर्तनात बोलतांना स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले की गुरूंचा महिमा व लीला अगाध असून जगात कसे जगावे श्री  गुरूंचे जीवन आपल्याला हेच शिकवतात श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांनी एकेकाळी निर्जन असलेल्या या ठिकाणी आपल्या दिव्य तपश्चर्येच्या माध्यमातून भगवान दत्तात्रयांना देवगड या क्षेत्री स्थित केले.उजाड माळरानाचे नंदनवन केले, समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले जीवन व्यथित केले त्यांनी निर्माण केलेले देवगडचे गुरुदेव दत्त पीठ हे भक्तांच्या सुखासाठी व  समाजाच्या उत्थानाकरीता असल्याचे सांगून येथील नियम व शिस्त यांचे पालन करून ते सांभाळण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन त्यांनी केले.श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या झालेल्या पुण्यतिथी सोहळयामध्ये योगदान देणाऱ्या व अन्नदान करणाऱ्या दात्यांचे व सेवेकऱ्यांचे कीर्तनकार मंडळींचे व भाविकांचे त्यांनी शब्द सुमानांनी आभार मानले.
यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी दिनकर महाराज मते,संतसेवक मधुकरबाबा पेसोडे,आमदार विठ्ठलराव लंघे,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,महंत प्रेमदास महाराज नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज पवार, गणपत महाराज आहेर,ज्ञानेश्वर महाराज हजारे,अतुल महाराज आदमने, संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे,तात्या महाराज शिंदे,शुभम महाराज बनकर,गायनाचार्य लक्ष्मण महाराज नांगरे बाबासाहेब महाराज सातपूते,संजय महाराज निथळे, मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव, दादा महाराज साबळे,लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, विजय महाराज पवार,पंढरपूर मठाचे व्यवस्थापक माऊली महाराज, पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब शिंदे,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, गायक रामजी विधाते,बजरंग विधाते,सरपंच अजय साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित हजारो भाविकांना ऊस्थळदुमाला येथील  ग्रामस्थ,श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ अण्णा नवले,नेवासा येथील सेवेकरी व्यापारी रविंद्र शिंगी,गोधेगाव येथील सेवेकरी विश्वनाथ हापसे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे