Breaking
ई-पेपर

डॉ ऐश्वर्या शिंदे यांचे Fmge परिक्षेत यश संपादन

0 6 0 5 3 1

डॉ ऐश्वर्या शिंदे यांचे Fmge परिक्षेत यश संपादन

भेंडा  प्रतिनिधी –  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथील प्रसिद्ध डॉ . कै . रामदास शिंदे यांची कन्या डॉ ऐश्वर्या रामदास शिंदे हिने रशिया मध्ये एम . बी .बी . एस . चे शिक्षण पूर्ण करून नुकतीच भारतात Fmge परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनिय यश संपादन केले आहे .
डॉ ऐश्वर्या शिंदे हिचे वडील कै डॉ . रामदास भानुदास शिंदे यांचे पहिल्या वर्षाच्या परिक्षेच्या कालावधीतच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते तरीही ऐश्वर्या ची आई सिमा रामदास शिंदे यांनी नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथील डाळिंबाची उत्तम प्रकारे शेती करून परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ऐश्वर्या ला आर्थिक पाठबळ कमी पडू दिले नाही .
ऐश्वर्या च्या यशा बद्दल भेंडा बु येथील विठ्ठल अर्बन को ऑफ पतसंस्थेच्या वतीने संचालक – सौ उषाताई संजय गव्हाणे, संस्थापक – कृष्णा गव्हाणे व डॉ लहानु मिसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार – नामदेव शिंदे, सुरेश दरवडे, कृष्णा मंडलीक, कृष्णा आरगडे, संजय बोरूडे, शुभम अढागळे, रूपाली चौधरी, आदींनी अभिनंदन केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे