जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गेवराई केंद्रातील नजीक चिंचोली शाळेची उत्तुंग कामगिरी

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गेवराई केंद्रातील नजीक चिंचोली शाळेची उत्तुंग कामगिरी
नेवासा – ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
घाडगे पाटील विद्यालय त्रिमूर्तीनगर नेवासा फाटा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जि.प.प्रा. शाळा नजीक चिंचोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली.*
थाळी फेक स्पर्धेत – वैभव कारभारी धाडगे
मोठा गट द्वितीय क्रमांक – 50 मीटर धावणे स्पर्धा लहान गट – मयूर तुकाराम चौघुले प्रथम क्रमांक या विद्यार्थ्यांना आपल्या नेवासे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी – शिवाजी कराड . गेवराई केंद्राचे केंद्रप्रमुख – नामदेव दहातोंडे व नामदेव शिरसाट शाळेचे मुख्याध्यापक – निवृत्ती कर्डिले, शिक्षक हरिश्चंद्र ठोंबरे , अंबादास खंडागळे , सतिश बळे, सौ. पल्लवी सायगावकर ,सौ मनीषा कावरे ,सौ मनीषा सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले
*विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे,मार्गदर्शक , नजीक चिंचोली चे ह.भ.प. गणेशानंद महाराज नवथर व ह.भ. प. श्री.भागचंद पाठक महाराज, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भागचंद चावरे, श्री शिवा भाऊ पाठक, ॲडव्होकेट – बन्सीभाऊ सातपुते, सरपंच सौ. वनमाला चावरे , लक्ष्मण जाधव , वि. का. वि. सोसायटीचे चेअरमन विधाटे अण्णा, सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले आहे .