*अहिल्यानगर वन कर्मचारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

अहिल्यानगर वन कर्मचारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
अहिल्यानगर :
अहिल्यानगर वन कर्मचारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अहिल्यानगर येथील उपवनसंरक्षक कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष बबनराव मंचरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेच्या विविध कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली तसेच सभासदांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.
सभेदरम्यान संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत आगामी काळातील वाटचालीबाबतही चर्चा झाली. सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल सातत्याने सुरू असून, संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या आर्थिक गरजा आणि हिताला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे उपाध्यक्ष साहेबराव भालेकर, संचालक किशोर गांगर्डे, राजू रायकर, भारत बनकर, सुधीर लाड, सचिव गोकुळा रोडे तसेच चंद्रकांत मरकड, जहांगीर शेख, नानासाहेब आठरे, ज्योती दाभाडे, आशा कुलकर्णी, सविता रायकर, सचिन गायकवाड, विष्णू मरकड, ज्योती शिरसाठ, लक्ष्मण मरकड, विशाल बनसोडे, आनंद तिवारी, संदीप कोरके, निलेश जाधव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सभासद उपस्थित होते.
सभेच्या निमित्ताने संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी पदाधिकारी व सभासदांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेमुळे संस्थेच्या कामकाजाला आगामी काळात अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




