Breaking
ई-पेपर

शांतीनिकेतन च्या चिमुकल्यानी जिंकली प्रेक्षकांची मने… वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन.उत्साहात संपन्न..

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची उपस्थिती..

0 6 0 5 3 1

शांतीनिकेतन च्या चिमुकल्यानी जिंकली प्रेक्षकांची मने…
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन.उत्साहात संपन्न..

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची उपस्थिती

कुकाणा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

अंतरवाली ता. नेवासा येथील महर्षी प्रतिष्ठान संचलित श्री साई शांतीनिकेतन विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन.उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते.विठ्ठलराव लंघे यांनी आपल्या मनोगतातुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या प्रसंगी
विविध वेशभुषेने नटलेले चिमुकले विद्यार्थी, मराठी-हिंदी गीतांच्या तालावर सुरु असलेली त्यांची लयबद्ध नृत्याविष्काराला उपस्थित प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद अशा वातावरणात परिसरातील महर्षी प्रतिष्ठान संचलित साई शांतीनिकेतन स्कूलचे स्नेहसंमेलन नुकतेच विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

सर्वधर्म समभाव व व्यसनमुक्ती नाटिका,
लोकगीत, पारंपरिक लावणी, मराठी, हिंदी गीतांवर बालकलाकारांनी रंगमंचावर नृत्ये सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिकंली. त्या वेळी या स्कूलच्या विध्यार्थ्यांनी विविध गाणी,लावण्या, देशभक्तीपर गीते नृत्यासह सादर केली.
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक कानडे, अंकुशराव कानडे, सरपंच दिनकरराव गर्जे, संदीप देशमुख सरपंच लता अभंग उपसरपंच सोमनाथ कचरे, सरपंच भाऊसाहेब सावंत, सरपंच स्वप्नांली क्षीरसागर,पत्रकार बाळासाहेब सरोदे, विलासराव लिपने,नाना गणगे, आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


कार्यमासाठी प्राचार्या कामिनी पंडित उप प्राचार्या अरुणा पारखे, यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले,
कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुशराव कानडे यांनी केले, सूत्रसंचालन शिक्षिका प्रिया मलोत्रा नम्रता भोसले तर आभार अमोल कानडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे