Breaking
ई-पेपर

दिघी सोसायटीचे चेअरमन व तीन संचालक पाच वर्षांसाठी अपात्र….

0 4 4 9 6 3

दिघी सोसायटीचे चेअरमन व तीन संचालक पाच वर्षांसाठी अपात्र….

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

तालुक्यातील दिघी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सध्या चर्चेत आली आहे. थकबाकीदार असूनही निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे सोसायटीचे चेअरमन सोपान अंबादास नागवडे यांच्यासह शोभा सुनील निकम, दत्तात्रय रामराव दळवी आणि मच्छिंद्र रावसाहेब गवळी या चार संचालकांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

हा निर्णय सहाय्यक निबंधक अधिकारी घोडेचोर यांनी दिला असून, त्यामुळे सोसायटीच्या कारभारात मोठा दिघी सोसायटीचे चेअरमन व तीन संचालक पाच वर्षांसाठी अपात्रबदल होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाची सुरुवात १७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाली, जेव्हा देविदास नागोडे यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले की, सोपान नागवडे, शोभा निकम, दत्तात्रय दळवी व मच्छिंद्र गवळी हे संचालक ३० जून २०२४ अखेरपर्यंत थकबाकीदार होते.

महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार, थकबाकीदार व्यक्तीला निवडणुकीत उमेदवारी सादर करण्यास अथवा मतदान करण्यास अपात्र ठरवले जाते. तथापि, वरील व्यक्तींनी २५ मार्च २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत भाग घेतला होता. त्या निवडणुकीतणुकीत सोपान नागवडे हे चेअरमनपदी निवडून आले. निवडणुकीच्या दिवशीच संपत ब्राह्मणे, शिवाजी निकम् व इतर संचालकांनी यावर आक्षेप घेत सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी अर्ज दाखल केला होता.

सहाय्यक निबंधक कार्यालयाने सर्व तक्रारींची दखल घेत १३ मे रोजी सुनावणी पूर्ण केली.

परंतु संचालकांचे जवाब ऐकून व आवश्यक दस्तऐवजांची तपासणी करून, १५ मे रोजी निर्णय दिला गेला. त्यामध्ये वरील चार संचालकांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले.

दिघी सोसायटीमध्ये एकूण १३ संचालक आहेत. यामधून चार संचालक अपात्र ठरल्याने सोसायटीच्या कारभारात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय आणि सहकारी वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली असून, पुढील घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे