Breaking
आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

कुकाण्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन..

0 4 0 5 3 3

कुकाण्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कुकाणा प्रतिनिधी -( महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )

महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न असलेल्या कृषि महाविद्यालय, सोनई च्या ग्रामीण कृषि कार्यनुभव कार्यक्रमाअंतर्गत केळी पिक उत्पादन ,तंत्रज्ञान व विविध शासकिय योजनांवर कार्यक्रम कुकाणा येथे आयोजित केला त्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषि महाविद्यालय सोनईचे प्राचार्य .डॉ.एच.जी.मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपप्राचार्य मा.श्री.प्रा.सुनील बोरुडे, ग्रामीण कृषि जागरूकता कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.अतुल दरंदले, प्रा.श्रीकृष्ण हुरुळे वनस्पती रोगशात्र विभागप्रमुख,प्रा.नरेंद्र दहातोंडे,प्रा.प्रदिप मखरे ,तसेच सरपंच सौ.लताबाई अभंग,उपसरपंच सोमनाथ कचरे,माजी सरपंच .दौलतराव देशमुख, माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, कृषि सहाय्यक .सौ.फुंदे मॅडम, नानासाहेब खराडे , ग्रामसेवक .बाळासाहेब आगळे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण कृषि जागरूकता कार्यक्रम अंतर्गत झालेल्या प्रथम सत्रात कृषि महाविद्यालय सोनईचे प्रा.श्री.श्रीकृष्ण हुरुळे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख यांनी केळी पिकांवरील रोग व त्यांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रा.श्री.नरेंद्र दहातोंडे किटकशास्त्र विभाग यांनी केळी पिकावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले.तसेच उपप्राचार्य .प्रा.सुनील बोरुडे यांनी महाविद्यालयामध्ये चालत असलेल्या विविध प्रकल्पांची जसे माती परीक्षण साठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा, जिवाणू खते प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका, यांची माहिती दिली व महाविद्यालयात भेट देण्याच्या आवाहन केले. त्यानंतर कृषि सहाय्यक .फुंदे शीतल यांनी विविध शासकिय योजनांवर मार्गदर्शन केले. कृषि महाविद्यालय सोनईचे कृषिदुत-प्रणव देवकर,अविष्कार भडके,शिवम जगताप,अजित भंडारे,हर्षल खेमनर यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. शेतकरी मोठ्या उत्साहात या मार्गदर्शना पर चर्चासत्रास मोठ्या संख्येने उपस्थित राहीले.शेतकऱ्यांनी प्रश्नही यादरम्यान उपस्थित केले व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या वेळी देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे