Breaking
ई-पेपर

महिलांनी आत्मनिर्भर होण्याची काळाची गरज – प्रा.उषाताई मिसाळ

0 6 0 5 0 7

महिलांनी आत्मनिर्भर होण्याची काळाची गरज
– प्रा उषाताई मिसाळ

भेंडा – ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

आपण आज २१ व्या शतकात पदार्पण केले असून ही महिला असुरक्षित आहे आज ही शुभ कार्याच्या प्रसंगी विधवा स्त्री ला कार्यक्रमात निमंत्रीत केले जात नाही . हि कृती थांबवून विधवा महिलेला कार्यक्रमात योग्य तो मान – सन्मान दिला पाहिजे यासाठी समाजातील काही स्त्रीयांनी मनाचा मोठेपणा दाखवून पूढाकार घेवून महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन भेंडा बु च्या माजी सरपंच – प्रा उषाताई मिसाळ यांनी केले आहे .

भेंडा बु ” ग्रामपंचायतच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी भेंडा गावच्या उपसरपंच – सौ संगिता नामदेव शिंदे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच – सुमनताई दत्तात्रय काळे, प्रा सौ उषाताई लहानु मिसाळ, सौ रोहिणी नामदेव निकम, सखूबाई अंबादास गोंडे, माजी उपसरपंच – सिमा रावसाहेब फुलारी आदी व्यासपिठावर प्रमुख उपस्थित होते .
यावेळी ग्रामसभेत महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सामुहिक संविधान वाचन करण्यात आले याप्रसंगी माजी सरपंच – सुमनताई दत्तात्रय काळे , प्रा उषाताई लहानु मिसाळ , रोहिणी नामदेव निकम , सखुबाई अंबादास गोंडे,माजी उपसरपंच – सिमा रावसाहेब फुलारी, स्मिता देवेंद्र काळे, लताबाई येडुभाऊ सोनवणे , शिक्षिका – राजश्री यादव , अंगणवाडी सेविका – सुनिता पवार, हिरा फुलारी , महिला सफाई कर्मचारी आदिंचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
महिला दिनानिमित्त रिना सचिन अढागळे यांच्या घरकुल बांधकामाचे उदघाटन उपस्थित सरपंच , उपसरपंच व ग्रा .सदस्य महिलांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारभारी गरड , डॉ लहानु मिसाळ, नामदेव शिंदे, देवेंद्र काळे, येडुभाऊ सोनावणे, अंबादास गोंडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे – सचिन ठाकरे, ग्रामसेक – रेवन्नाथ भिसे, बाबासाहेब गोर्डे, विष्णु फुलारी आदी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे