Breaking
ई-पेपर

*भेंडा खुर्द सोसायटीच्या उपाध्यक्षपदी मच्छिंद्र धनवडे यांची बिनविरोध निवड*

यांची बिनविरोध निवड* *आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित व मावळते उपाध्यक्षांचा सत्कार; शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार*

0 8 9 9 1 8

*भेंडा खुर्द सोसायटीच्या उपाध्यक्षपदी मच्छिंद्र धनवडे यांची बिनविरोध निवड*

*आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित व मावळते उपाध्यक्षांचा सत्कार; शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार*

नेवासा | प्रतिनिधी-

नेवासा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भेंडा खुर्द येथील कै. नामदेवराव नवले पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी मच्छिंद्र धनवडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा संस्थेचे विद्यमान चेअरमन रविंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दशरथ मापारी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड करण्यात आली. मच्छिंद्र धनवडे यांच्या निवडीचे उपस्थित संचालक, सभासद व ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना चेअरमन रविंद्र नवले म्हणाले, “गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत उपाध्यक्ष दशरथ मापारी यांनी माझ्यासोबत योग्य निर्णय घेत सोसायटी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले काम केले. संस्थेच्या वाटचालीत सर्व संचालक व सदस्यांनी दिलेले सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. यापुढील काळातही सर्व समाजघटकांना सोबत घेऊन योग्य न्याय देत गाव व परिसराच्या विकासासाठी काम केले जाईल.”
तसेच काशिनाथ अण्णा नवले, रामकृष्ण नवले सर, हरिभाऊ नवले व कुमार तात्या नवले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम अधिक प्रभावीपणे करून सोसायटीला नावलौकिक मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मच्छिंद्र धनवडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपाध्यक्ष मच्छिंद्र धनवडे तसेच मावळते उपाध्यक्ष दशरथ मापारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक कै. कुंडलिकराव नवले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नवले, संतोष महापूर, प्रशांत खरात, सतीश नवले व बाबा गजरे यांच्या वतीने नूतन उपाध्यक्ष मच्छिंद्र धनवडे आणि मावळते उपाध्यक्ष दशरथ मापारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निवडीनंतर ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
यावेळी सोसायटीचे संचालक मच्छिंद्र शिंदे, गणेश नवले, रोहन नवले, दामू महापूर, गंगुबाई मोरकर, गणेश बबन नवले, युवा नेते सिद्धांत दादा नवले, हरिभाऊ नवले, सुनील खरात, वामन मापारी, भाऊसाहेब गदाई, बाप्पूराव नवले, हर्षवर्धन नवले, राजू वाघडकर, विश्वास नवले, संजय साळवे, सुरेश धनवडे, संदीप धनवडे, दादा धनवडे, अशोक उपळकर, नारायण लष्करे, बाळासाहेब कुसाळकर, प्रशांत खरात, रघुनाथ मोरकर, हौशीराम महापूर, जालिंदर धनवडे, बाळासाहेब पिटेकर, रवी धनवडे, वसंत धनवडे, सुदीप खरात सर, बबनराव धनवडे, अरुण साळवे, आकाश काजळे, अमोल महापूर, दादा नवले, सौरभ नवले, अमोल गदाई यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक काशिनाथ अण्णा नवले, रामकृष्ण नवले सर व कुमार तात्या नवले यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष मच्छिंद्र धनवडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आदेश जावळे यांनी केले, तर हरिभाऊ नवले यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे