Breaking
ई-पेपर

विष्णू नंदाराम निकम यांचा सलाबतपुर विविध कार्यकारी सोसायटी पदाचा राजीनामा तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर स्वखुशीने राजीनामा तर निवृत्ती रंगनाथ नजन यांच्या नावाची चेअरमन पदासाठी निवड.

0 4 5 9 8 9

विष्णू नंदाराम निकम यांचा सलाबतपुर विविध कार्यकारी सोसायटी पदाचा राजीनामा तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर स्वखुशीने राजीनामा तर निवृत्ती रंगनाथ नजन यांच्या नावाची चेअरमन पदासाठी निवड.

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे आज नवीन चेअरमन पदी सलाबतपुर येथील प्रगतशील शेतकरी श्री निवृत्ती रंगनाथ नजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीची सूचना तीन वर्ष अखंडपणे चेअरमन पदाचा कारभार पाहत असलेले विष्णु नंदराम निकम यांनी मांडली तसेच या सूचनेला अनुमोदन श्री भागचंद पोपट तांबे यांनी दिले. तसेच सर्वानुमते श्री निवृत्ती रगंनाथ नजन यांची सलाबतपुर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली.

विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री निवृत्ती रंगनाथ नजन हे वय वर्ष 70 ते 75 वर्षाच्या असून त्यांनी सलाबतपुर गावांमध्ये अनेक पदे भुशवली आहेत व त्या पदाच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत व त्याच धर्तीवरती आज त्यांची सलाबतपुर विविधकार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे कामकाज निवडणूक अधिकारी म्हणून श्री एस व्ही ठोंबरे सहाय्यक निबंधक कार्यालय नेवासा तसेच सलाबतपुर सोसायटीचे सचिव संभाजी नवले यांनी बघितले व या निवडीची घोषणा एस.व्ही.ठोंबरे सहाय्यक निबंधक कार्यालय नेवासा यांनी केली.

चेअरमन पदी श्री निवृत्ती रंगनाथ नजन यांची निवड झाल्या नंतर सलाबतपुर कार्यकारी सोसायटीच्या वतीने हार व पुष्पहार श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.
सोसायटी सदस्य अंबादास गोरे, अ.हक्क अ सत्तार शेख , राजेंद्र साळुंके, अंबादास गोरे, भागचंद तांबे, शिवाजी साळुंके दत्तात्रय निकम, सुभाष गवळी, जगन्नाथ गायकवाड, सौ सरस्वती अंबादास कदम, सौ कमलाबाई सुरेश कपिले, देविदास परदेशी

या निवडी प्रसंगी सलाबतपुरचे सरपंच अजहर शेख, राऊफ शेख, नवनाथ शिंदे, बाळासाहेब साळुंके , काकासाहेब कर्डिले ,सुनील नजन, बबनराव तांबे, रामदास निकम, अश्पाक शेख, जाऊल शेख,

आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीनंतर निवृत्ती रंगनाथ नजन यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे व शुभेच्छाच्या वर्षाव होताना पहावयास मिळत आहे.

तसेच यावेळी निवृत्ती रंगनाथ नजन बोलताना म्हणाले की मी या पदाचा वापर विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व सभासद वर्गाला न्याय देण्याचं काम करणार आहे तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून शेतीसाठी मदत करणार असल्याचे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे