Breaking
ई-पेपर

*कुकाण्याच्या प्राजक्ता कचरे यांना राज्यस्तरीय ‘शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर!*

*MPSC परीक्षेत तीन शासकीय पदांसाठी निवड झालेल्या प्राजक्ता कचरे यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी*

0 9 5 0 2 3

*कुकाण्याच्या प्राजक्ता कचरे यांना राज्यस्तरीय ‘शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर!*

*MPSC परीक्षेत तीन शासकीय पदांसाठी निवड झालेल्या प्राजक्ता कचरे यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी*

नेवासा | महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील गुणवंत कन्या कु. प्राजक्ता संजय कचरे यांच्या शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय यशाचा आणखी एकदा गौरव होणार आहे. श्री संत किसन महाराज सुडके संस्थान, कांगोणी फाटा यांच्या वतीने सन २०२६ चा राज्यस्तरीय शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार प्राजक्ता कचरे यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त गट-ब परीक्षेत दुय्यम निबंधक श्रेणी-१, कर उपनिरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या तीन शासकीय पदांसाठी निवड झाल्यानंतर आता राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जात आहे.

ग्रामीण भागात राहून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत स्थान मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राजक्ता कचरे यांची वाटचाल प्रेरणादायी ठरत आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजनबद्ध तयारी, जिद्द, मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकाच वेळी तीन महत्त्वाच्या शासकीय पदांसाठी झालेली त्यांची निवड ही त्यांच्या अभ्यासातील सातत्याची आणि गुणवत्तेची साक्ष मानली जात आहे.

श्री संत किसन महाराज सुडके संस्थानच्या वतीने साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि ग्रामीण उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता या विभागासाठी प्राजक्ता कचरे यांची निवड करण्यात आली आहे. विविध वाङ्मय प्रकारांतील १६५ पुस्तकांचे परीक्षण करून साहित्य पुरस्कारांसह विविध क्षेत्रांतील पुरस्कारांची घोषणा विजयादशमीच्या दिवशी करण्यात आली.

या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता कांगोणी फाटा येथील श्री संत किसन महाराज सुडके संस्थान येथे संत-महंत आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

प्राजक्ता कचरे यांच्या या यशामुळे कुकाणा गावासह नेवासा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत आपले स्थान निर्माण करावे, असा सकारात्मक संदेश मिळत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे