Breaking
ई-पेपर

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत काही छबीदार इच्छुकांचा डंका थेट सोशल मीडियावर!

राजकीय नेत्यांसोबत छब्या उमटवित आपणच उमेदवार असल्याचा अविर्भावात हौशी मंडळींचा काहूर!

0 6 0 5 0 6

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत काही
छबीदार इच्छुकांचा डंका थेट सोशल मीडियावर!

राजकीय नेत्यांसोबत छब्या उमटवित आपणच उमेदवार असल्याचा अविर्भावात हौशी मंडळींचा काहूर!

नेवासा प्रतिनिधी -( विशेष प्रतिनिधी राजेंद्र वाघमारे)

 

नेवासे नगरपंचायत निवडणुकीचा राजकीय आखाडा हार – जीत होवून संपल्यामुळे आता विजयी सत्ताधाऱ्यांना आत्मविश्वास तर पराभूत नेत्यांनी पराभवाची कारणीमीमींसा ओळखत आता पुन्हा जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी गण आणि गटाचा राजकीय होरा ओळखत पुन्हा आपली राजकीय रणनिती आखण्यास सुरुवात केलेली अाहे नेवासे तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गणात जनाधार असलेल्या काही उमेदवारांना चक्क आपल्याच पक्षाकडून निवडणुक लढविण्यासाठी नेतेमंडळींकडून गळ घातली जात असतांना माञ ज्यांना काही जनाधार नाही? अशी काही छबीदार हौशी मंडळी दररोजच आपापल्या नेत्यांच्या संपर्कात राहून भाऊ – दादा अन् साहेबांच्या पुढे – पुढे करुन या होणाऱ्या निवडणुकीत आपल्याच पदरात तिकीट पाडून घेण्यासाठी विविध नानाक्लुप्ता आखत सोंगीडबाजा कार्यक्रम राबतवित आपल्या राजकीय सोंगट्या आखतांना हौशी मंडळी आता या आखाड्यात चांगलीच तरबेज झाल्याचे दिसून येत आहे तर जनाधार असलेली नेतेमंडळी माञ या राजकीय आखाड्याचा कानोसा घेत थांबा आणि पहाच्या भूमिकेत आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात सध्या माञ जनाधार नसलेली मंडळीच आपल्या नावाची टिमकी वाजवितांना राजकीय आखाड्यात दिसून येत आहेत.
नेवासे तालुक्यात काही संघटनात्मक कागदोपञी निवड झालेले छबीदार हौशी मंडळी आता माञ तिकट वाटपच आमच्या हातात असून या गटाचा उमेदवारही मीच राहणार असल्याच्या अविर्भावात राहून आपली झलक दाखवितांना दिसून येत आहेच गावात लवकर ग्रामपंचायत सदस्य सुद्धा न झालेली काही हौशी मंडळी चक्क जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक लढविण्याच्या फंदात पडण्याची अभिलाषा ठेवत ‘हमसे बढकर कोण’? असा सुर राजकीय आखाड्यात आवळत आपल्या उमेदवारीची स्वयंमघोषीत घोषणा करुन चक्क आपली टिमकी वाजवितांना दिसून येत आहेत.
त्यामुळे आता राजकीय आखाड्यातील भाऊ,दादा आणि साहेबांना माञ याचा मोठा मनस्ताप होत असतांनाही त्यांना माञ ‘धराव तर चावतय अन् सोडावा तर पळतय? अशी गत झाल्यामुळे या अशा काही या हौशी बहाद्दरांनामुळे सध्या माञ राजकीय पुढारी या बहाद्दरांना विचारु करु? जनमत पाहू अन् फायनल करु? असे ठोबळ आश्वासन देत वेळ मारुन नेतांना दिसून येत आहेत तर काही हौशी इच्छुक मंडळी माञ सकाळ पासूनच आपल्या नेत्यांच्या मागे – पुढे फिरत नेत्यांबरोबर आपल्या छब्या त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात उमटवून सोशल मीडियाचा आधार घेत आपली चांगलीच टिमकी वाजवितांना दिसून येत असल्यामुळे जनतेचाही माञ चांगलाच विरंगुळा होतांना दिसून येत आहे.

..,………………………………//…………………………….
जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीचा आखाडा थोड्याच कालावधीनंतर सुरु होणार असल्यामुळे या राजकीय आखाड्यात काही हौशी मंडळी सध्या नेत्यांच्या दररोज संपर्कात राहून आपल्याच पदरात तिकीट पाडून घेण्यासाठी कार्यक्रमातून नेत्यांबरोबर थेट छब्या उमटवून त्याचा मोठा गाजावाजा करतांना सोशलमीडियात दिसून येत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे