Breaking
ई-पेपर

वादळ-वाऱ्याने झालेल्या पीक व मालमत्ता नुकसानीची आमदार विठ्ठलराव लंघे यांनी अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली.

0 4 5 8 6 8

नेवासा तालुक्यात ११ जून रोजी वादळ-वाऱ्याने झालेल्या पीक व मालमत्ता नुकसानीची आमदार विठ्ठलराव लंघे यांनी अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली.

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले आहेत. विजेचे खांब व झाडे उन्मळून पडले आहेत. या आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुका प्रशासनासह प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल.

यावेळी नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, महावितरणचे उपअभियंता बडवे व महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सायम, बी. टी. सोनवणे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 8 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे