**शिक्षण क्षेत्राला नवे नेतृत्व! ज्ञानवर्धिनी बालक मंदिरच्या चेअरमनपदी प्रा. अमोलजी वैद्य यांची एकमताने निवड; अकोले तालुक्यात आनंदाचे वातावरण*
**शिक्षण क्षेत्राला नवे नेतृत्व!
ज्ञानवर्धिनी बालक मंदिरच्या चेअरमनपदी प्रा. अमोलजी वैद्य यांची एकमताने निवड; अकोले तालुक्यात आनंदाचे वातावरण*
अहिल्यानगर | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
अकोले तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपणाऱ्या ज्ञानवर्धिनी बालक मंदिर या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या चेअरमनपदी प्रा. अमोलजी वैद्य यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून शिक्षण, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. अमोलजी वैद्य हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताची भूमिका बजावत आहेत. तसेच सुगाव खुर्द गावाचे माजी सरपंच, रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे माजी असिस्टंट गव्हर्नर म्हणून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वक्षमतेची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी सोपविली आहे.
प्रा. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानवर्धिनी बालक मंदिराच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक भर पडेल, विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना चालना मिळेल आणि आधुनिक शिक्षणाच्या दिशेने संस्थेची वाटचाल अधिक वेगाने होईल, असा विश्वास पालक, शिक्षक आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या निवडीमुळे अकोले तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला सक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभल्याची भावना व्यक्त होत असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. अमोलजी वैद्य यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



