आमच्या गाड्यांमध्ये जागा नाही डॉ.सुजय विखे.
सुजय विखे यांच्या नेवाशात येण्याने डॉ.घुलें सह महायुतीच्या उमेदवारांना आशेचा किरण....
आमच्या गाड्यांमध्ये जागा नाही – डॉ.सुजय विखे…
सुजय विखे यांच्या नेवाशात येण्याने डॉ.घुलें सह महायुतीच्या उमेदवारांना आशेचा किरण…..
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
आमच्या गाड्यांमध्ये जागा नाही आमच्या गाड्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत असा टोला गडाख यांचे नाव न घेता डॉ.सुजय विखेंनी लगावला .
नेवासा तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या नगरपंचायत च्या निवडणुकीच्या माध्यमातून डॉ.सुजय विखे हे नेवासामध्ये प्रचाराच्या नारळाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की नेवासा शहरांमधील होऊ घातलेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या विकासाची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन या वेळी बोलताना डॉ. सुजय विखे यांनी दिले.
कुणी जर सांगत असेल की आमच्या पार्टीमध्ये मतदान टाका आम्ही निवडून आल्यानंतर तिकडेच जाणार आहोत परंतु आता आमच्या गाडीमध्ये जागा नाही आमच्या गाडीमध्ये कुणालाही आम्ही घेणार नाही असा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी माजी मंत्री आमदार गडाखांवर नाव न घेता टीका केली.
महायुतीचे व्यासपीठावरती बसलेले हे सर्व उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आणा हे आपल्या नेवासा शहराचे भवितव्य आहे नेवासा शहरामध्ये काम करत असताना अनेक मुद्दे आहेत महायुतीने सक्षम उमेदवार या ठिकाणी दिलेत याचा मला आनंद आहे.
देशामध्ये आपला प्रधानमंत्री आहे महाराष्ट्र मध्ये आपले सरकार आहे तसेच मुख्यमंत्री आहेत जिल्ह्यामध्ये आपला पालकमंत्री आहे तालुक्याला आपला आमदार आहे म्हणून हा विकास आम्हीच करू शकतो ही भूमिका आपली असली पाहिजे विरोधकांवर बोलताना म्हणाले की दुसरा व्यक्ती कोणत्या मुद्द्यावरती आश्वासन देणार आहे.
तुम्ही आमदार निवडून देताच या आमदारांनी ८ महिन्यांमध्ये नेवासा शहराच्या विकासासाठी ५० कोटी रुपये निधी आमदार लंघेंनी आणला राज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे तसेच मी निवडणूकीत निवडून येण्यासाठी कधीही जाती धर्माचा सहारा घेत नाही ज्यांना निवडून येणे शक्य नाही ते लोक जाती-धर्माचा सहारा घेतात ज्यांना विकास जमत नाही आणि सुजय विखेंच सिम्बंल फक्त विकास आणि विकास आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की संगमनेर मध्ये ही मी गाडी रुळावर आनली आहे आता नेवाश्याची गाडी रुळावर आणायची आहे म्हणून आपल्याला या शहरांमध्ये या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तालुक्यातील गावोगावी सर्वात महत्त्वाचा पाण्याचा मुद्दा आपल्याला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे माध्यम सोडवायचा आहे .
आज फक्त विठ्ठलराव लंघे पाटील आमदार नाही तर या व्यासपीठावर बसलेले सर्वच आमदार आहेत असे त्यांनी बोलताना सांगितले.
डॉ. सुजय विखे हे नेवासा नगर पंचायत सर्वत्रिक निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करणसिंह घुले बोलताना म्हणाले की नेवासा शहरामध्ये अनेक प्रश्न सोडवायचे आहेत आपण अनेक दिवसांपासून ज्यांना सत्तेवर बघतो त्यांनी नेवासा शहर उजाड करण्याचं काम केलं आपल्या नगरपंचायत चौकातील व्यापारी संकुल गेल्या पाच वर्षापासून वादग्रस्त पद्धतीने बंद ठेवण्याचे कुटील डाव विरोधकांनी केले नेवासा शहराला आपल्या शेजारीच असलेल्या प्रवरामाईचे वरदान आहे परंतु नेवाशा शहराला दहा दहा दिवस पाणी मिळत नाही याची जबाबदारी मागच्या सत्यादारांनी घेतली पाहिजे सर्व व्यासपीठावरील व जनतेच्या साक्षीने डॉ घुले म्हणाले की मी अभिवचन देतो की ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यासाठी आपण सर्वांनी महायुतीच्या सर्व उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले डॉ. करणसिंह घुले हे महायुतीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
महायुतीच्या प्रचार मोहिमेला नेवासा शहरामध्ये सोशल मीडिया वरती चांगला मोठा प्रतिसाद मिळतांनी पहावयास मिळत आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे, उद्योजक प्रभाकर शिंदे, भाजपाचे नितीन दिनकर, किसनराव गडाख, रामभाऊ खंडागळे, ज्येष्ठ नेते शंकराव लोखंडे तसेच आधी महायुतीचे उमेदवार मंचावर उपस्थित होते.




