अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेत पिकाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई करण्याची मागणी..
शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन..

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेत पिकाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई करण्याची मागणी….
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
या शेतकरी संघटनेच्या निवेदनामध्ये म्हटले आहे की नेवासा तालुक्यामधील गेल्या तीन ते चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाले आहे त्यामध्ये गहू ,कांदा ,केळी, डाळिंब टरबूजवाडी, पपई, हरबरा ,भुईमूग, आधी रब्बी पिकांचे व फळबागांचे त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचे गहू हे पिके भुई सपाट झाले असून तसेच कांद्याच्या पाथीमध्ये पाणी गेले असून खराब प्रत त्याची झाली आहे.
अशा नैसर्गिक संकटांमधून शेतकऱ्याला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत मिळावी व त्वरित पंचनामे करून खात्यावर मदत जमा करावी अशा प्रकारची विनंती शेतकरी संघटनेच्या वतीने तसेच 13/03/2022 नुसार लाभधारक शेतकऱ्यांची पाणीपट्टी वीस हजारा पेक्षा जास्त असेल आणि वसुली होत नसेल तर संबंधित लाभधारकाच्या उताऱ्यावर शासनाच्या नावाने बोजा चढवण्यात यावा या परिपत्रकानुसार जलसंपदा विभाग सक्तीची वसुली करत आहे.
वास्तविक यावर्षी संपूर्ण अतिवृष्टी झाल्यामुळे शासनाने कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये असा शासनाचा आदेश आहे सदर थकबाकीदार शेतकऱ्यांच्या बेकायदेशीर रित्या कोणत्याच शेतकऱ्याच्या सातबारा उतारा वरती महाराष्ट्र शासन किंवा जलसंपदा विभागाचे नाव लावण्यात येऊ नये अन्यथा शेतकरी संघटना याची गंभीर दखल घेऊन रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाईच्या तयारीत आहे याची शासनाने दखल घ्यावी.
या निवेदना वेळी हरिभाऊ तुवर, मेजर अशोक काळे, तालुका उपाध्यक्ष शेतकरी संघटना बाबासाहेब नागोडे, डॉ. रोहित कुलकर्णी, एडवोकेट ज्ञानेश्वर शिरसाट, विधीतज्ञ कायदेशीर सल्लागार एडवोकेट बाळासाहेब कावळे, प्रसिद्धी प्रमुख दादासाहेब नाबदे , कैलास पवार, प्रवक्ते कार्लस साठे सर, बंडोपंत चौगुले, दत्तात्रय निकम ,किरण लंघे, सोमनाथ औटी आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.




