*वीज वितरणाचा भोंगळ कारभार; देडगाव-तेलकुडगाव परिसरातील शेतकरी आक्रमक*.
शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आकाश चेडे यांचा इशारा..

वीज वितरणाचा भोंगळ कारभार; देडगाव-तेलकुडगाव परिसरातील शेतकरी आक्रमक..
शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आकाश चेडे यांचा इशारा..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
देडगाव, तेलकुडगाव पाचुंदा, माका महालक्ष्मी हिवरा,व परिसरातील शेतीपंपांना होणाऱ्या अपुऱ्या व अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतीसाठी दररोज किमान ८ ते १० तास वीज पुरवठा अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ६ तासच वीज दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यातही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण बनले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
याबाबत युवा नेते आकाश चेडे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आवाज उठवला असून त्यांनी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याशी संपर्क करत समस्या निदर्शनास आणून दिली. या समस्येची गंभीर दखल घेत आमदार लंघे यांनी मंत्रालय, मुंबई येथून संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्याची माहिती आकाश चेडे यांनी दिली.
आकाश चेडे पाटील यांनी इशारा देताना सांगितले की, “शेतकऱ्यांना नियमित आणि पुरेसा वीज पुरवठा मिळाला नाही तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही.”
देडगाव-तेलकुडगाव परिसरात शेती वीज पुरवठ्याबाबत तीव्र नाराजी.
अपेक्षित ८ ते १० तासांऐवजी केवळ ६ तास वीज पुरवठा.
वारंवार वीज खंडित होत असल्याने पिकांना फटका.
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान.
युवा नेते आकाश चेडे पाटील यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिली माहिती.
मंत्रालयातून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचा दावा.
वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा.
शेतकऱ्यांना तातडीने नियमित वीज देण्याची मागणी चेडे यांनी केली आहे.




