Breaking
ई-पेपरकृषीवार्ता

शेतकऱ्यांनी गहू पिकाच्या जैव संतृप्त वाणांचा वापर करावा : – नारायण निबे

0 6 0 4 6 5

शेतकऱ्यांनी गहू पिकाच्या जैव संतृप्त वाणांचा वापर करावा : नारायण निबे

अहिल्यानगर – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

“गहू जैव संतृप्त वाण उत्पादन तंत्रज्ञान” या विषयावरील शेती दिन उत्साहात साजरा
मानवाच्या योग्य वाढ आणि विकासासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. तो रोगांना प्रतिबंधित करण्यास मदत करतो, शिवाय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी शरीराचे चयापचय राखतो. अन्न आपल्या दैनंदिन चयापचय गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा, प्रथिने, आवश्यक चरबी, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे प्रदान करते. त्यासाठी गहू जैव संतृप्त वाण आपल्या शेतामध्ये घेऊन त्यांचा वापर आपल्या आहारामध्ये करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने च्या कृषि विद्या विभागाचे प्रमुख श्री. नारायण निबे यांनी केले.

कोळगाव तालुका शेवगाव येथील श्री. विनायक झिरपे, कोरडे वस्ती येथे आयोजित शेती दिन कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम श्री. सचिन बडधे , विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार), श्री. आर.व्ही. ढाकणे , सह्हायक कृषि अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत झिरपे यांच्या उपस्थितीत पार पडला.
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, कृषि विज्ञान केंद्र , दहिगाव ने मा. अध्यक्ष आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील , उपाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, तज्ञ संचालक डॉ. क्षितीज घुले पाटील आणि सर्व विश्वस्त मंडळ श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था, भेंडे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत , कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने यांचे मार्फत गहू जैव संतृप्त वाण समूह आद्यरेषा पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन कोळगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर येथे रब्बी हंगाम २०२६ मध्ये करण्यात आलेले आहे. यामध्ये एच.आय. १६३३ या वाणाचे प्रात्यक्षिक सदर गावात २५ प्रगतशील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले आहे. गहू पिकातील आधुनिक तंत्रज्ञान तसेच जैव संतृप्त वाण तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे दृष्टीने हे प्रात्यक्षिक घेतले असून जास्तीत जास्त उत्पादन देणारे जैव संतृप्त सोबतच योग्य लागवड तंत्रज्ञान , माती परीक्षणानुसार योग्य अन्न द्रव्यांचा वापर, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच काढणी पश्च्यात तंत्रज्ञान या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा कृषि विज्ञान केंद्राचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून आज येथे “गहू जैव संतृप्त वाण उत्पादन तंत्रज्ञान” या विषयावर शेती दिनाचे आयोजन करण्यात आले. शेती दिनानिमित्त शेतकऱ्यांनी गहू पिकात वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत झिरपे, श्री. विनायक झिरपे आणि श्री. अर्जुन खंडागळे यांनी दिली. सदर प्रात्यक्षिकात जैव संतृप्त वाण, त्यांनी रासायनिक तसेच जिवाणू खताची बिजप्रक्रीया, सुक्ष्म अन्नद्रव्य चा वापर, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विस्तार विभागाचे विषय विशेषज्ञ श्री. सचिन बडधे यांनी शेती दिनाचे महत्व उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.
श्री. नारायण निबे , विषय विशेषज्ञ (कृषि) विद्या , कृषि विज्ञान केंद्र , दहिगाव ने यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) प्रजनन पद्धती वापरून धान्ये, डाळी, तेलबिया, भाज्या आणि फळांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जातींमध्ये पौष्टिक गुणवत्ता सुधारली आहे. १२ व्या योजनेत बायोफोर्टिफिकेशनवरील कन्सोर्टियम रिसर्च प्लॅटफॉर्मवर एक विशेष प्रकल्प सुरू करून विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले. इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांच्या सहकार्याने एकत्रित प्रयत्नांमुळे तांदूळ, गहू, मका, बाजरी, मसूर , शेंगदाणे, जवस, मोहरी, सोयाबीन, फुलकोबी , बटाटा, रताळे, आणि डाळिंब या ८७ जाती विकसित केल्या तसेच देशाची पौष्टिक सुरक्षा साध्य करण्यासाठी या बायोफोर्टिफाइड जाती खूप महत्त्वाच्या आहेत. या जैव संतृप्त वाणांना जनतेमध्ये लोकप्रिय करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जैव संतृप्त वाणांचे दर्जेदार बियाणे तयार केले जात आहेत आणि व्यावसायिक लागवडीसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. आयसीएआरच्या विस्तार विभागाने त्यांच्या कृषी विज्ञान केंद्रांद्वारे (केव्हीके) जैव संतृप्त वाणांचा विस्तार करण्यासाठी पोषण अभियान सुरु करून प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर जैव संतृप्त वाणांचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत. या विषयी माहिती दिली.
यावेळी प्रगतशील शेतकरी अशोक झिरपे, प्रदिप झिरपे, अशोक झिरपे, अक्षय झिरपे , अरुण खंडागळे तसेच कृषि विज्ञान केंद्राचे तांत्रिक सह्हाय्क श्री. धनंजय भुमकर आणि निलेश काळे तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन बडधे तर श्री. चंद्रकांत झिरपे यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे