Breaking
ई-पेपर

*ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध; भेंडा गटातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण*

0 8 9 9 5 9

*ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध; भेंडा गटातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण*

नेवासा प्रतिनिधी :- महाराष्ट्र 7 न्यूज वृत्तसेवा

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने तालुक्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. एकीकडे बिनविरोध निवडणुकीचे स्वागत होत असताना, दुसरीकडे या प्रक्रियेमागील राजकीय गणितांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी गटांना या निवडणुकीतून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे यांची भूमिका या निवडणुकीत तुलनेने शांत राहिल्याने चर्चा अधिक रंगू लागली आहे.
कारखाना निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान आमदार लंघे हे स्वतःहून राजकीय मैदानापासून दूर राहिले की त्यांना नियोजनपूर्वक बाजूला ठेवण्यात आले, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या  मर्जीने भेंडा गटातील कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत काही प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला आणि त्यामुळे काही राजकीय सूत्रे बदलली गेली, अशीही चर्चा राजकीय जाणकारांमध्ये ऐकायला मिळत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
याचबरोबर आमदार विठ्ठलराव लंघे यांचे जावई सिद्धांत नवले हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्रिय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवले परिवाराशी संबंधित संभाव्य राजकीय दावेदारांना या निवडणुकीच्या प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आले का, असा प्रश्नही काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
भेंडा गटातील राजकारणात आगामी काळात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येत असताना विविध गटांमध्ये हालचाली वाढल्या असून, साखर कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीचा परिणाम स्थानिक राजकारणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या या सर्व घडामोडींबाबत अधिकृत पातळीवर कोणतेही स्पष्ट वक्तव्य समोर आलेले नसले तरी, भेंडा गटातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येणारे दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. राजकीय चर्चांमधून पुढे कोणती नवी समीकरणे समोर येतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे

2.5/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे