Breaking
ई-पेपर

*वरखेड लक्ष्मी आई तीर्थक्षेत्री जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था*

*सलाबतपूर पुलावर खड्ड्यांमध्ये साचले पावसाचे पाणी; भाविक व वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर*

0 8 9 9 1 8

*वरखेड लक्ष्मी आई तीर्थक्षेत्री जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था*
*सलाबतपूर पुलावर खड्ड्यांमध्ये साचले पावसाचे पाणी; भाविक व वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर*

नेवासा प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या वरखेड येथील लक्ष्मी आई देवी देवस्थानाकडे जाणाऱ्या खडकफाटा–सलाबतपूर–शिरसगाव–वरखेड मार्गावरील सलाबतपूर येथील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांसह भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरखेड लक्ष्मी आई देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक येत असतात. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवस्थानाची ख्याती असून वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
सलाबतपूर येथील पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी पुलाच्या खालून वाहणाऱ्या नदीचे पाणीही स्पष्टपणे दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुलावरील संरक्षण कठडेही अनेक ठिकाणी नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे पुलावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकी, चारचाकी वाहने खड्ड्यांमध्ये अडकण्याच्या घटना घडत आहेत.
पावसाळ्यात या मार्गावरून भाविक, शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत पुलाची जीर्ण अवस्था आणि पाण्याने भरलेले खड्डे यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असून प्रसारमाध्यमांतूनही या समस्येकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले आहे. तरीदेखील अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
नागरिकांची मागणी आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून खड्डे बुजवावेत, पुलाची उंची वाढवावी, मजबूत संरक्षण कठडे उभारावेत तसेच कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
“दरवर्षी पावसाळ्यात पुलाची हीच अवस्था होते. आता तरी प्रशासन जागे होऊन तातडीने दुरुस्ती करणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

3/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे