*प्राजक्ता संजय कचरे यांच्या यशाचा कुकाण्यात गौरव; एकाच वेळी तीन शासकीय पदांवर निवडीची उल्लेखनीय कामगिरी*

*प्राजक्ता संजय कचरे यांच्या यशाचा कुकाण्यात गौरव; एकाच वेळी तीन शासकीय पदांवर निवडीची उल्लेखनीय कामगिरी*
नेवासा प्रतिनिधी –
कुकाणा, ता. नेवासा : कुकाणा, तालुका नेवासा येथील प्राजक्ता संजय कचरे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उल्लेखनीय यश संपादन करत शासकीय सेवेत प्रवेशाची उज्ज्वल कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुकाण्यासह नेवासा तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्राजक्ता कचरे यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर एकाच वेळी तीन महत्त्वाच्या शासकीय पदांसाठी निवड झाली आहे. यामध्ये ASO – सहायक कक्ष अधिकारी, SR Grade-1 – पोलीस उपनिरीक्षक आणि STI – कर निरीक्षक या पदांचा समावेश आहे. एकाच वेळी विविध प्रशासकीय व पोलीस सेवांशी संबंधित पदांवर पात्रता सिद्ध करणे ही त्यांच्या मेहनतीची, चिकाटीची आणि स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेची साक्ष मानली जात आहे.
प्राजक्ता यांनी अभ्यास, ध्येय निश्चिती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश मिळवू शकते, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या कामगिरीतून मिळत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुकाणा परिसरातील नागरिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता यांच्या यशामुळे कचरे परिवारासह कुकाणा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठीही सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
‘अभ्यास हीच पूजा, ध्येय हीच दिशा, जिद्द हीच ताकद आणि यश हीच ओळख’ या भावनेतून प्राजक्ता कचरे यांनी मिळविलेले यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
कुकाण्याच्या कन्येच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी शासकीय सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा!



