Breaking
ई-पेपर

*चास येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न*.

*शिबिराचे उद्घाटन पद्मश्री श्री. पोपटराव पवार यांच्या हस्ते शुभारंभ*

0 8 9 9 1 8

चास येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न…

शिबिराचे उद्घाटन पद्मश्री श्री. पोपटराव पवार यांच्या हस्ते शुभारंभ…

अहिल्यानगर प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

 

प्राथमिक आरोग्य केंद्र, चास येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन पद्मश्री श्री. पोपटराव पवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद काकडे, चास गावचे सरपंच युवराज कार्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाघ तसेच डॉ. पूजा साळवे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पद्मश्री पोपटराव पवार यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने नियमित आरोग्य तपासणी करून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व अत्यंत मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी नोबेल हॉस्पिटलचे डॉ. ऋषिकेश उदमले व त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या पथकाने केली. शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली व आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे