Breaking
ई-पेपरराजकिय

नेवासा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास ४४ कोटींची तत्वतः सुधारीत प्रशासकीय मान्यता-आ.विठ्ठलराव लंघे यांची माहिती

0 6 0 5 2 1

नेवासा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास ४४ कोटींची तत्वतः सुधारीत प्रशासकीय मान्यता-आ.विठ्ठलराव लंघे यांची माहिती

नेवासा/प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नगरोत्थान महाभियान नेवासा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास ४४ कोटी ४२ लाख रुपयांची तत्वतः सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.

अधिक माहिती देताना आ.लंघे म्हणाले की, राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता नगरोत्थान महाभियान राबविण्यात येत आहे.नगरोत्थान अभियानांतर्गत नेवासा नगरपंचायतेचा पाणी पुरवठा प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालया मार्फत शासनास सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली
आहे. त्याअनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीसमोर सादर करण्याच्या अटीच्या अधिन सदर प्रकल्पास तत्वतः प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्यानुसार नगर विकास विभागाने
यास तत्वतः मान्यता व मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे