Breaking
ई-पेपर

मुळा धरणातून शेतीसाठी आज शुक्रवारी आवर्तन सुटणार – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील

0 9 0 0 1 7

मुळा धरणातून शेतीसाठी आज शुक्रवारी आवर्तन सुटणार – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील

पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या भक्कम साथीमूळ भर उन्हाळ्यासह पावसाळ्यातही शेतकऱ्यांना वेळेवर आवर्तन मिळत असल्याचे हेच खरे समाधान – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील!

नेवासा –

यंदाच्या पावसाळा ऋतूच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज भासू लागल्यामुळे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेवून मुळा धरणातून शेत पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार लंघे – पाटील यांनी मुळा धरणातून आवर्तन सोडण्यासाठी साकडे घातले असता पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने मुळा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कु.सायली पाटील यांना दिल्यामुळे आज शुक्रवार (दि.२१) रोजी मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांतून पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या कामगिरीचे मोठे कौतुक केले जात असून पालकमंत्री विखे – पाटील यांना शेतकऱ्यांतून धन्यवाद दिले जात आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत प्रामुख्याने जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत असला तरी शेती पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याच्या आवर्तनांची मोठी गरज असल्याची शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना मुळा धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली असता पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने मुळा धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना दिल्यामुळे आज बुधवारी मुळा धरणातून शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आवर्तन सोडले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी,मका आणि अन्य पिकांना मोठे जीवदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन कधीही कमी पडू दिले जाणार नाही,नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची गरजही भासणार नाही असे ठोक आश्वासन दिलेले असतांना त्या आश्वासनाचे तंतोतंत पालन होत असल्यामुळे शेतकऱ्यांतून पालकमंत्री विखे – पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव केला जात आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी कधीही पाणी कमी पडू दिले जाणार नसल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी आवर्जून सांगितलेले असतांना आता भर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेवून वेळेवर पाणी मिळत असल्यामुळे पालकमंत्री विखे – पाटील यांच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव केला जात आहे.

चौकट
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याच्या आवर्तनाची मोठी गरज होती अनेक शेतकऱ्यांनी मला आवर्तन सोडण्यासाठी मागणीही केलेली होती आपण याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लगेच मुळा धरणातून तातडीने आवर्तन सोडण्याचे आदेश मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना दिलेले असून आज शुक्रवारी सायंकाळी आवर्तन सोडले जाणार असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली….

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील आणि नेवासा तालुक्याचे कार्यधुरंधर आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांसाठी भर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सुद्धा कधीही पाणी कमी पडू दिलेले नसल्यामुळे बळीराजा मंत्री विखे – पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांचा शतशः ऋणी राहणार आहे.
सरपंच सतीश काळे तेलकुडगाव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे