सातबारा कोरा करण्यासाठी ७-१२-२०२५ या तारखेच्या औचित्य साधून शेतकरी शिरसगावात शेतकरी मेळावा सपन्न..

सातबारा कोरा करण्यासाठी ७-१२-२०२५ या तारखेच्या औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचे शिरसगावात आयोजन….
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
शिरसगाव येथे सातबारा कोरा करण्यासाठी ७-१२-२०२५ तारखेचे अवचित्य साधून शेतकरी मेळाव्याचे आयोजन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी ऍड. अजित काळे बोलताना म्हणाले की सातबारा कोरा करण्याची मोहीम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यापासून चालू असून महाराष्ट्र मध्ये जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे जाऊन आम्ही आमची भूमिका मांडत आहोत शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे यासाठी हा संघर्ष चालू असल्याचे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांनी बोलताना सांगितले.
तसेच यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना जर महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचा कलंक लागलेला आहे तो आत्महत्याचा कलंक पुसून काढण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे रघुनाथ दादा पाटील यांनी बोलताना सांगितले ही शरद पवारांनी त्यांच्या केंद्रीय मंत्री पदाच्या कालखंडामध्ये साडेआठ टक्के ची रिकव्हरी दहा टक्के केली त्यामध्ये शेतकऱ्यांना लुटण्याचे काम शरद पवारांनी केले असल्याचा घनाघाती आरोप त्यांनी शरद पवारांवर केला. तसेच साखर कारखाने हे लुटीचे अड्डे झाले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
शेतकरी संघटनेचे बुलंद तोफ लक्ष्मण वडले बोलताना म्हणाले की शेतकऱ्याची लूट हे कारखानदार करत आहेत त्यामुळे आत्महत्या चे प्रमाण वाढत आहे आणि तो आत्महत्याचा कलंक पुसण्यासाठी आम्ही येत्या 12 तारखेला शरद जोशी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करखानदार हे एक टना माघे तीन रिकवरी चोरत असून तसेच उत्पादन खर्च करताना घोळ करत असल्याचा आरोप त्यांनी कारखानदारावर केला आहे तसेच शेतकऱ्याच्या ऊसाला साडेसात हजार रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले .
महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील तसेच उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिरसगाव येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रघुनाथ दादा पाटील हे होते तसेच यावेळी डॉक्टर कुलकर्णी , एडवोकेट अजित काळे, लक्ष्मण वडले, युवराज पाटील, अरुण गोरे, भास्कर तुवर, बाबासाहेब खराडे, शिंदे सर, मुमताज भाई, डॉ.कोकणे भाऊसाहेब तराळ,विश्वास मते , महेश ढोकणे,सुधाकर देशमुख,सोमनाथ औटी, अशोक ढगे, पुरुषोत्तम सर्जे, ज्ञानेश्वर शिरसाट, बाळासाहेब कावळे , दत्तात्रय निकम दादासाहेब नाबदे, युवराज जगताप,बाबासाहेब नागवडे ,किरण लंघे ,सुधाकर देशमुख, दादासाहेब नाबदे, अशोक पोटे, विनायक विथापे, लक्ष्मण लंघे ,गणेश गोरे ,सोमनाथ औटी, अरुण देशमुख अनिल साळुंके, एडवोकेट ज्ञानेश्वर शिरसागर, एडवोकेट सागर सागडे, रामभाऊ निकम, गजानन पोटे, विष्णू मिसाळ, बापूसाहेब देशमुख, बापूसाहेब तरमळे ,लक्ष्मण राशिनकर, ज्ञानदेव कोरडे, सुरेश खाटीक, बंडू चौगुले, लक्ष्मण लंघे, तकट्याबा बर्गे साहेब, हरदे साहेब, दादासाहेब पोटे, दत्तात्रय पोटे, तसेच यावेळी मदन खंडागळे व अरुण गोरे यांनी शेतकरी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला.



