Breaking
ई-पेपर

*पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तत्परता; ‘त्या’ दोन तासात तळला मोठा अनर्थ *

*मुलीला पळवण्याचा डाव फसला; नेवासा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी*

0 9 0 0 1 5

*पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तत्परता; ‘त्या’ दोन तासात तळला मोठा अनर्थ!*

*मुलीला पळवण्याचा डाव फसला; नेवासा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी*

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तल्लख बुद्धिमत्तेमुळे आणि तातडीच्या हालचालींमुळे एका तरुण-तरुणीला पळवून नेण्याचा मोठा डाव अवघ्या दोन तासांत हाणून पाडण्यात आला. संवेदनशील प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
दोन्ही बाजूंकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका मुलाचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. “मुलगा कामाला जातो असं सांगून गेला तो परतला नाही,” अशी तक्रार त्यांनी दिली. मात्र, पोलिसांना माहिती देताना ते दिशाभूल करत असल्याचा संशय पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना आला. त्यांनी तात्काळ पोलीस पाटलांशी संपर्क साधला असता, गावातून एक मुलगीही बेपत्ता असल्याचे समोर आले. मुलीच्या नातेवाईकांनीही पोलिसांना चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला, परंतु दराडे यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे सर्व डावपेच अपयशी ठरले.
*मुलाचा ‘शातिर’ प्लॅन;पोलिसांची चक्रावून टाकणारी खेळी*

लोकेशन ट्रॅकिंग आणि थरारक पाठलाग
अन… चालत्या बसमधून मुलीला घेतले ताब्यात!
मुलाचे लोकेशन तपासले असता मुलगा हा नेवासाच्या बाजूलाच असल्याचे निष्पन्न झाले त्याला ताब्यात घेतले असता पोलिसांचा खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला त्याने मुलीला पंढरपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे (श्रीरामपूर विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शेवगाव विभाग) नीरज राजगुरू यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी वेळ न घालवता गुन्हा दाखल करण्याच्या आणि परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, संबंधित मुलावर अपहरण आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात आली आहे. दराडे यांनी तातडीने संबंधित बस डेपो आणि पंढरपूर पोलिसांशी संपर्क साधला. बस चालकाच्या मोबाईलवरून मुलाशी झालेला शेवटचा संपर्क आणि लोकेशनचा आधार घेत, चालत्या बसमधून मुलीला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
**वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कारवाई*
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे (श्रीरामपूर विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शेवगाव विभाग) नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या टीमने केली
*”छेडछाड कराल तर याद राखा; थेट मला संपर्क करा!” – पो. नि. दराडे*
या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी अत्यंत कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले, “मुलींना कोणी छेडत असेल, पाठलाग करत असेल किंवा मोबाईलवर मेसेज करून त्रास देत असेल, तर घाबरू नका. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना ‘जागेवर चोप’ दिला जाईल. पालकांनी आणि मुलींनी कोणत्याही संकोचाशिवाय माझ्याशी ७३८५५५३१२० या क्रमांकावर संपर्क साधावा.”
> “अशा घटनांमध्ये पीडित मुलीचे नाव आणि तिचे आडनाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल. समाजकंटकांना मुळापासून ठेचून काढण्यासाठी पोलिसांना मदत करा, आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.
>
पोलीस निरीक्षक दराडे यांच्या या कठोर भूमिकेचे आणि नेवासा पोलिसांच्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे