युवक नागरिकाने आमदार लंघेना फोनवरून केला वाढदिवसाला येण्याचा आग्रह आमदार लंघे फिरले आपल्या घराच्या दारातून सर्वसामान्य युवक साठी माघे.

सर्वसामान्य युवक नागरिकाने आमदार लंघेना फोनवरून केला वाढदिवसाला येण्याचा आग्रह आमदार लंघे फिरले आपल्या घराच्या दारातून सर्वसामान्य युवक साठी माघे…..
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
सर्वसामान्य कार्यकर्ताशी व जनतेशी नाळ जोडलेला नेता म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे यांची ओळख होताना नेवासा तालुक्यात होताना पहावयास मिळत आहे.
आज त्याचेच उदाहरण म्हणून आज नेवासा तालुक्यातील सुलतानपूर येथील एक सर्वसामान्य छोटाशा कार्यकर्त्यासाठी एक फोन वरती भाऊ माझा वाढदिवस आहे तुम्ही माझ्या झोपडी मध्ये वाढदिवसाला या असा आग्रह त्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी आ.लंघेना केला.
दीपक मारुती इंगळे त्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव व प्रेमाखातर आ.लंघे हे निवासस्थानी पोहोचता पोहचता गाडी मागे वळून त्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या सुलतानपूरच्या घरी पोहोचले.
सुलतानपूर येथील कार्यकर्ता दीपक मारुती इंगळेनी आमदार आपल्या फोनवरती मागे आपल्या वाढदिवसासाठी आले याचा त्याला खूप आनंद झाला व त्यांनी आमदार विठ्ठलराव लंघेंना दारात पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला अशी त्याची स्थिती झाली.
फोनवरती आपल्या वाढदिवसाला आपल्या झोपडी मध्ये आमदार आले हे पाहून त्याला आनंद झाला.
यावेळी कार्यकर्ता दीपक मारुती इंगळे बोलतांना म्हणाला की असा आमदार मी आतापर्यंत पाहिला नाही आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या रूपाने आम्हाला नेवासा तालुक्याला आमदार नव्हे तर हक्काचा माणूस आम्हाला मिळाल्याची भावना सुलतानपूरच्या दीपक मारुती इंगळे व इंगळे कुटुंबीयांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीपक इंगळे बोलताना म्हणाला की आम्हाला नेवासा तालुक्याला आमदार नव्हे तर एक हक्काचा माणूस मिळाला आम्ही कधीही आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हाताला धरून कामे करून घेऊ शकतो असा विश्वास आमदारांनी आज मला दिला यातच मला मोठा आनंद होत आहे व माझ्यासारख्या छोटेशा कार्यत्याच्या वाढदिवसाला आमदार लंघे पाटील हे माझ्या आग्रहस्तव आले यातच मी आनंदी आहे.
तसेच यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दीपक मारुती इंगळे याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ.विठ्ठलराव लंघे पाटील बोलताना म्हणाले की माझी आमदार की ही व्ही.आय.पी नसून सर्वसामान्यांच्या दारात पोहोचणारी आमदारकी आहे सर्वसामान्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्यांचे अडीअडचणी सोडवण्यासाठी ही मी आमदारकी पणाला लावणार आहे .
त्याचेच हे आज एक उदाहरण मला पहावयास मिळाले लहान ,मोठा, न पाहता मी सर्वांच्या कामासाठी व सर्वसामान्यांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहील असे आपल्या भाषणातून त्यांनी विश्वास व्यक्त केला त्यातलाच हा माझा सुलतानपूरचा छोटासा जरी असला तरी मनाने मोठा असलेला कार्यकर्त्याच्या प्रेमाखातर मी घराच्या दारातून मागे फिरलो व त्याचे प्रेम व तळमळह पाहून मी त्याच्या वाढदिवसाला आज त्याच्या घरापर्यंत पोहोचलो हेच काम यापुढे सर्वसामान्यांसाठी चालू राहील व सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचे काम मला पुढील काळामध्ये मोठ्या जोमाने करायचं आहे .
आणि ते काम करण्यासाठी आशा कारकार्यकर्त्यापासून मला नेहमी बळ मिळत असते स्व.आ.वकिल अण्णांची शिकवण घेऊन चालणारा मी एक कार्यकर्ता त्याची उत्तराई होण्याचा आज मला योग आला त्याचेच एक उदाहरण म्हणून आज हा दीपक मारुती इंगळे या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला येण्याची संधी मिळाली यापुढेही नेहमीच स्वर्गीय आ.वकीलराव लंघे पाटलांनी दिलेली शिकवण घेवून काम करणार असल्याचे आ.लंघेनी बोलताना सांगितले.