Breaking
ई-पेपर

*भेंडा गावचे ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी*

0 8 9 9 1 8

*भेंडा गावचे ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी*

नेवासा तालुका प्रतिनिधी :–

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यात्रे निमित्त हजारो भाविकांनी  सोमवारी दर्शनाचा लाभ घेतला  आहे.

दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी श्रीसंत नागेबाबांची यात्रा भरते.यात्रेच्या दिवशी सकाळी ९ वाजता श्रीसंत नागेबाबांचे पादुका व गंगेच्या पाण्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.दुपारी १२ वाजता नागेबाबांचे समधीस जलाभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या  प्रत्येक भाविकाला आमटीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.यासाठी ६० कढई (सुमारे २७ हजार ३० हजार लिटर) आमटी तयार करण्यात आली होती. भाविकांना घरोघरी नेण्यासठी आमटी वाटप करण्यात आले तसेच यात्रास्थळी उपस्थितांना आमटी-भाकरीचा प्रसाद देण्यात आला.सायंकाळी ५ वाजता
ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक झाली. रात्री छबिना मिरवणूक ही झाली.
यावर्षी यात्रेतील कावडी मिरवणुकीसाठी पारंपरिक बँड व ढोल तासा या वाद्यांचा वापर केल्याने मिरवणूक शांततेत पार पडली.

श्रीक्षेत्र आळंदीच्या मिराबाई महाराज मिरीकर, आमदार विठ्ठलराव लंघे,
माजी मंत्री शंकरराव गडाख,माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार बाळासाहेब मुरकुटे, काशिनाथ नवले, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, ज्ञानेश्वरचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,जनरल मॅनेजर रविंद्र मोटे आदींनी दर्शन घेतले.
यात्रेची सांगता आज मंगळवारी श्रीक्षेत्र आळंदीच्या मीराबाई महाराज मिरीकर यांचे काल्याचे किर्तनाने होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे