Breaking
ई-पेपर

*कुकाणा येथे कृषिकन्यांचे उत्साहात स्वागत; आधुनिक शेतीचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार*

0 8 9 9 5 4

*कुकाणा येथे कृषिकन्यांचे उत्साहात स्वागत; आधुनिक शेतीचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार*

कुकाणा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषि महाविद्यालय, भानासहिवरे येथील कृषिकन्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत या कृषिकन्या पुढील काही दिवस गावात वास्तव्यास राहून शेतकरी व ग्रामस्थांसाठी विविध कृषी प्रात्यक्षिके, मार्गदर्शन शिबिरे आणि जनजागृतीपर उपक्रम राबविणार आहेत.
या कार्यक्रमात कृषिकन्या ऋतुजा खताळ, ईश्वरी थिगळे, वैष्णवी उंडे आणि रूपाली वसावे या सहभागी झाल्या आहेत. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, मृदा आरोग्य, सेंद्रिय शेती, कीड व रोग व्यवस्थापन, शासकीय कृषी योजनांची माहिती तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन त्या शेतकऱ्यांना करणार आहेत.
कृषिकन्यांच्या आगमनानिमित्त गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालय, भानासहिवरेचे प्राचार्य डॉ. तुरभटमठ सर यांचे मार्गदर्शन लाभत असून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील शेतीची प्रत्यक्ष माहिती मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही आधुनिक शेतीविषयक ज्ञानाचा लाभ होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे